Lokmat Sakhi >Social Viral > ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली महेश्वरी सिंदूरी साडीची मागणी! बघा नेमकी कशी असते ही साडी...

ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली महेश्वरी सिंदूरी साडीची मागणी! बघा नेमकी कशी असते ही साडी...

Maheshwari Sindoori Saree Is In High Demand After Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर जिची मागणी प्रचंड वाढली ती सिंदूरी साडी तुम्ही पाहिली आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 12:16 IST2025-05-31T12:14:54+5:302025-05-31T12:16:08+5:30

Maheshwari Sindoori Saree Is In High Demand After Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर जिची मागणी प्रचंड वाढली ती सिंदूरी साडी तुम्ही पाहिली आहे का?

maheshwari sindoori saree is in high demand after operation sindoor for pm Narendra Modi's event | ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली महेश्वरी सिंदूरी साडीची मागणी! बघा नेमकी कशी असते ही साडी...

ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली महेश्वरी सिंदूरी साडीची मागणी! बघा नेमकी कशी असते ही साडी...

Highlightsमहिला सशक्तीकरणाचे प्रतिक, अहिल्याबाईंच्या कार्याला वंदन आणि ऑपरेशन सिंदूर या तिन्ही घटनांमुळे महिलांनी सभेसाठी केशरी रंगाची महेश्वरी साडी नेसण्याचे ठरविले

कोणत्या गोष्टीचा परिणाम कशावर होईल काही सांगता येत नाही. कारण एका कृतीशी अन्य कित्येक गोष्टी जोडलेल्या असतात. आता हेच पाहा ना दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यातून पाकला चांगलाच धडा शिकवला. भारत दहशतवादाविरुद्ध अतिशय कठोर भुमिका घेत आहे, असा संदेशही जगाला मिळाला. आता ऑपरेशन सिंदूरनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्यांदाच एका सभेसाठी भोपाळला जात आहे. त्यांच्या सभेसाठी मध्यप्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री निर्मला भुरिया यांनी सिंदूर रंगाची म्हणजेच लाल- केशरी रंगाची महेश्वरी साडी खरेदी केली असून त्यांच्या पाठोपाठ प्रभारी कमिशनर निधी  निवेदिता यांनीही सिंदूरी रंगाची साडी घेतली. या दोघींचे अनुकरण करून अन्य महिलाही लाल- केशरी  रंगाची साडी  खरेदी  करून पंतप्रधान मोदींच्या सभेला हजेरी लावणार असल्याचा अंदाज तिथले व्यापारी व्यक्त करत आहेत.(Maheshwari Sindoori Saree Is In High Demand After Operation Sindoor)

 

ऑपरेशन सिंदूरमुळेच त्या रंगाच्या महेश्वरी साडीची मागणी वाढली आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यापैकीच एका कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी भोपाळला जात आहेत.

ब्लड प्रेशर, शुगर नेहमी वाढलेली असते? रामदेव बाबा सांगतात खास उपाय- तब्येत राहील ठणठणीत 

महेश्वरी साडी हे महिला सशक्तीकरणाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. कारण साधारण २५० वर्षांपुर्वी अहिल्या बाईंनीच महेश्वरी साडीच्या निमित्ताने महिलांना एक मोठा उद्योग उभारून दिला हाेता. आजही कित्येक कुटुंबांचे पोट महेश्वरी साडीच्या उद्योगावर अवलंबून आहे.

पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर

या कार्यक्रमाला २ लाखांपेक्षाही अधिक महिला उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिला सशक्तीकरणाचे प्रतिक, अहिल्याबाईंच्या कार्याला वंदन आणि ऑपरेशन सिंदूर या तिन्ही घटनांमुळे महिलांनी सभेसाठी केशरी रंगाची महेश्वरी साडी नेसण्याचे ठरविले असल्याचे निर्मला भुरिया यांनी सांगितले, अशी माहिती न्यूज १८ ने दिली आहे. 

 

Web Title: maheshwari sindoori saree is in high demand after operation sindoor for pm Narendra Modi's event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.