Join us

Maggi with Roofafza in viral video : अरे आवरा यांना! भावानं रूह अफजा टाकून बनवली मॅगी; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:09 IST

Maggi with Roofafza in viral video : फूड ब्लॉगर अर्जुन चौहानने स्ट्रीट फूड विक्रेत्याचा   रूह अफजासोबत मॅगी बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर व्हिडिओ शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या विचित्र खाद्यप्रयोग व्हायरल होत आहेत. फंटा मॅगी, आईस्क्रीम न्यूडल्स, टॉमॅटो पान अशा वेगवेगळ्या खाद्यप्रयोगांनी यावर्षी इंटरनेट गाजवलं. सध्या सोशल मीडियावर  रूह अफजा मॅगीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना संताप अनावर झाला आहे.

फूड ब्लॉगर अर्जुन चौहानने स्ट्रीट फूड विक्रेत्याचा   रूह अफजासोबत मॅगी बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर व्हिडिओ शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. क्लिपमध्ये एक माणूस  रूह अफजाची बाटली हलवत मॅगीच्या भांड्यात टाकताना दिसत आहे. त्यानंतर अर्जुन मॅगीचा आस्वाद घेतो आणि त्याच्या हावभावांवरून कळतं या आगळ्या वेगळ्या मॅगीची चव कशी आहे. 

या क्लिपला 3.3 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि नेटिझन्सच्या अनेक संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांचं आवडतं स्नॅक्स मॅगी नष्ट करण्याबद्दल निराशा व्यक्त केली, तर काहींनी विचित्र पदार्थांची चव किती भयानक असेल याकडे लक्ष वेधले. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये, सो सौतेच्या फूड ब्लॉगर अंजली धिंग्राने, दूध आणि चॉकलेट सॉस वापरून मॅगी बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यावर नेटिझन्सकडून अनेक संतप्त प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

फायर पाणीपुरी 

तिखट पाणीपुरी, गोड पाणीपुरी किंवा जलजीरा पाणीपुरी असे पाणीपुरीतल्या पाण्याचे वेगवेगळे फ्लेवर्सही खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. काही काही ठिकाणी तर एकाच ठेल्यावर पाणीपुरीचे तब्बल १५- २० वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात. इथपर्यंत तर सगळं ठिक आहे. पण हल्ली फायर पाणीपुरी हा नवाच प्रकार काही शहरांतून चाखायला मिळत आहे.

एका तरूणीने फायर पाणीपुरीचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला होता. त हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर (social media) धूमाकुळ घालत आहे. अहमदाबादमध्ये एका पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी विक्रेत्याने वेगवेगळे पदार्थ घालून मस्त पाणीपुरी तयार केली. त्यानंतर या पाणीपुरीवर चक्क आग लावली आणि समोर ग्राहक म्हणून आलेल्या तरूणीच्या तोंडात अशी जाळ असलेली पाणीपुरी घातली. 

टॅग्स :मॅगीसोशल मीडियासोशल व्हायरल