Join us

आता एवढंच राहिलं होतं, काय तर म्हणे मॅगी आईस्क्रिम रोल! कुठून येतात या आयडिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 15:20 IST

Social viral: मॅगी आणि आईस्क्रिमसोबत केलेला हा खेळ पाहून खवय्ये जाम भडकले आहेत.. हे असे प्रयोग का करता रे, असं म्हणून त्यांचा राग व्यक्त करत आहेत..

ठळक मुद्देYe maggi ke shaktiyo ka galat istemal ho ra hai maa अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे..

मॅगी म्हणजे अनेक भारतीयांची जान... नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत कशातही मॅगी चालू शकते, इतके मॅगीचे चाहते आपल्याकडे आहेत.. दिवसदिवस मॅगी (maggi) खाऊन राहणाऱ्यांचीही काही कमी नाही.. शिवाय आईस्क्रिम ... हे देखील अनेकांच्या जीवाच्या आतलं.. मॅगीवर जेवढं प्रेम तेवढाच आईस्क्रिमवर (ice cream) जीव.. या दोन्ही जिवाभावाच्या पदार्थांसोबत केलेला असा हा खेळ (weird food combination) अनेक खवय्यांना मात्र मुळीच आवडलेला नाही.. 

 

आज काल लोक कशात काय टाकून खातील काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात मॅगी आणि आईस्क्रिम यांच्यासाेबत तर नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. कुणी रुह अफ्झा टाकून मॅगी पितं काय तर कुणी मसाला डोसा आईस्क्रिम करतं काय.. आता एका खाद्य पदार्थ विक्रेत्यानेही असाच एक प्रयोग केला आहे.. त्याने चक्क मॅगी आईस्क्रिम रोल बनवला आहे. हा अतरंगी व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या thegreatindianfoodie या पेजवर शेअर करण्यात आला असून अनेक लोक हा व्हिडिओ (viral video) पाहून चांगलेच भडकले आहेत. Ye maggi ke shaktiyo ka galat istemal ho ra hai maa अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे..

नेहमीच्या कोशिंबीरी खाण्याचा कंटाळा आलाय? ग्रीन गॉडेस सॅलेड करा, कोशिंबीरीला क्रंची ट्विस्ट

 

या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की हा पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीने सगळ्यात आधी शिजवलेली मॅगी एका कोल्ड पॅनवर घेतली आहे. या मॅगीवर तो क्रिम, आईस्क्रिम टाकतो आहे. क्रिम टाकल्यानंतर तो हे मिश्रण चांगल्याप्रकारे कुटून, दाबून एकजीव करतो आहे. त्यानंतर एकत्र झालेलं हे मिश्रण तो त्या कोल्ड पॅनवर पसरवतो आणि त्यानंतर त्याचे लहान लहान मॅगी आईस्क्रिम रोल बनवतो. हे रोल एका डिशमध्ये ठेवल्यानंतर तो त्यावर चाॅकलेट सॉस, स्प्रिंकल्स असं सगळं टाकून डेकोरेट करतो आहे... आता हा पदार्थ कसा लागतो, ते तर चाखून बघणाऱ्यांनाच ठाऊक. पण अशा पद्धतीने बनविलेला हा मॅगी आईस्क्रिम रोल सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालतो आहे, एवढं मात्र नक्की. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नपाककृतीइन्स्टाग्राम