Join us

बोंबला! महिलेच्या पाठीवर बसून अख्खं शहर फिरत होती पाल; मागच्या कारवाल्यानं काढला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:35 IST

Lizard on Woman Suit Video : व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये  महिलेच्या पाठीवर पाल बसली आहे. पाल पाहिल्यानंतर अनेकदा लोक घाबरतात.

घरात पाली नाहीत असं एकही घर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कितीही पळवून लावलं तरी घरात पालींचा वावर काही थांबत नाहीत. पण कपड्यांवर पाली फिरताना तुम्ही कधी पाहिल्या आहेत का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल. (Lizard on Woman Suit Video) आतापर्यंत तुम्ही अनेक कुत्र्यांना, मांजरींना बाईकवरून जाताना पाहिलं असेल पण पाल फिरतानाचा असा व्हिडिओ पहिल्यांदाच व्हायरल होत आहे.  (Trending video lizard on woman suit who was riding on scooty video viral on social media) 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये  महिलेच्या पाठीवर पाल बसली आहे. पाल पाहिल्यानंतर अनेकदा लोक घाबरतात. 

या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला स्कूटीवर बसलेली दिसत आहे.  दरम्यान, मागून येणाऱ्या कार स्वारांची नजर पालीवर पडली, त्यानं हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, त्यानंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलेला कल्पनाही नाही की पाल तिच्या कुर्तीवर  आहे.

तिच्यासाठी कायपण! आजारी पत्नीचे केस विंचरणाऱ्या आजोबांचं प्रेम पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

हा व्हिडिओ आतापर्यंत 12 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 3.30 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या बाईकच्या मागे असलेल्या कार चालकानं हा व्हिडिओ शूट केल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया