आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आई मुलांचं प्रेम शब्दात व्यक्त करता येणचं कठीण आहे. आपल्या मुलांपासून दूर जावं असं कोणत्याच आईला वाटत नाही. पण जबाबदारीमुळे घराबाहेर पडावं लागतं आणि मुलांनाही दूर ठेवावं लागतं. आई जरी ऑफिसमध्ये काम करत असली तरी तिचं पूर्ण लक्ष आपल्या बाळाकडे असतं. बाळानं नीट खाल्लं असेल का, माझी आठवण येत असेल का असे बरेच प्रश्न आईच्या डोक्यात असतात. घरी असलेली मुलंसुद्धा आईची वाट पाहत बसलेले असतात. (Little Kid Gets emotional After Watching Mother Returns Home Doing 8 Hours Shift Viral Video)
अशात सोशल मीडियावर असाच एक आई मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वर्किंग आई आपली ८ तासांची शिफ्ट पूर्ण करून घरी येते. आईला पाहून मुल जी रिएक्शन देते ती खरंच हृदयस्पर्शी आहे. सुरूवातीला मुल खूप नारात असते कारण बराचवेळानंतर आई त्याच्याकडे येते. निरागसपणे ते मूल आपल्या आईला पाहते नंतर आईला पाहून तोंड फिरवते. कारण त्याला आई नसताना आईची खूप आठवण येत असते आणि आईला समोर पाहिल्यानंतर इमोशनल होतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लहान मूल रडू लागते पण जेव्हा आई प्रेमानं त्याला आपल्याजवळ बोलावते तेव्हा लगेच ते आईच्या कुशीत जाते आणि मिठी मारते. आईनं कुशीत घेतल्यानंतर त्या मुलाचा सर्व राग शांत होतो. या व्हिडिओतील लहान मुलाचे रिएक्शन व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @shiwaniofficial_ या नावानं इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे जो व्हायरल होत आहे.
दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग, आरी वर्क ब्लाऊजवर उठून दिसेल
या व्हिडिओवर लोकांची रिएक्शन काय आहे?
आत्तापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आपल्या बाळापासून दूर राहणं खूपच कठीण असतं अशी कमेंट एकानं केली आहे तर काहींना मुलाचा चेहरा पाहून अश्रू आले आहेत. तुमचं बाळ खूप नशीबवान आहे की त्याच्याजवळ इतकी माणसं आहेत अशी कमेंट एका युजरनं केली आहे.
Web Summary : A viral video captures a working mother returning home after an 8-hour shift. The baby's initial sadness turns to joy, running to hug her. This heartwarming moment shows the strong bond between mother and child.
Web Summary : एक वायरल वीडियो में एक कामकाजी माँ 8 घंटे की शिफ्ट के बाद घर लौटती है। बच्चे का शुरुआती दुख खुशी में बदल जाता है, और वह उसे गले लगाने के लिए दौड़ पड़ता है। यह दिल को छू लेने वाला पल माँ और बच्चे के बीच के मजबूत बंधन को दर्शाता है।