डेटिंग एप्सपेक्षाही एक पाऊल पुढे टाकून आता LinkedIn वर नात्यांची भरती होऊ लागली आहे. गुरुग्राममधून समोर आलेल्या अशाच एका 'जॉब व्हॅकन्सी'ने इंटरनेटवर सर्वांचच लक्ष वेधलं आहे. या जाहिरातीत गर्लफ्रेंडसाठी चक्क आवश्यक पात्रता, जबाबदाऱ्या आणि हायब्रिड वर्क मॉडेल पर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या गोष्टीची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.
LinkedIn ला आजवर लोक नोकरी, प्रमोशन आणि प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी ओळखत होते, पण यावेळी हा प्लॅटफॉर्म एका अगदी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका व्यक्तीने 'फुल टाइम गर्लफ्रेंड' साठी नोकरीची जाहिरात पोस्ट केली. ही पोस्ट इतकी वेगळी आणि धक्कादायक होती की, काही तासांतच सोशल मीडियावर ती व्हायरल झाली. हे विचित्र जॉब ॲड LinkedIn वरून Reddit आणि त्यानंतर X पर्यंत पोहोचले. लोकांना हा जोक वाटत होता, पण पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की हा जोक नव्हे, तर एक सीरियस व्हॅकन्सी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही पोस्ट दिनेश नावाच्या व्यक्तीने केली होती, जो यापूर्वी Tech Mahindra सारख्या मोठ्या आयटी कंपनीत सीनियर असोसिएट राहिलेला आहे, म्हणजे प्रोफेशनल पार्श्वभूमीत कोणतीही कमतरता नाही. कदाचित याच कारणामुळे त्याने नातंही एका प्रोफेशनल जॉब डिस्क्रिप्शनप्रमाणे सादर केलं दिनेशने आपल्या LinkedIn पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की, तो गुरुग्राम, हरियाणा येथे राहणाऱ्या 'फुल टाइम हायब्रिड गर्लफ्रेंड' च्या शोधात आहे. 'हायब्रिड मॉडेल' वाचूनच लोक चकित झाले. म्हणजे नातंही आता वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये विभागलं गेलं आहे.
या जॉब एडमध्ये गर्लफ्रेंडसाठी ज्या योग्यता होत्या, त्या कोणत्याही कॉर्पोरेट रोलपेक्षा कमी नव्हत्या. पोस्टनुसार, उमेदवारामध्ये मजबूत भावनिक संबंध निर्माण करण्याची क्षमता असावी. ती अर्थपूर्ण संभाषण करू शकणारी असावी, प्रत्येक परिस्थितीत पार्टनर असावी आणि पार्टनरचे छंद व ॲक्टिव्हिटीजमध्ये सक्रियपणे भाग घेणारी असावी. याशिवाय, एक्टिव्ह संवाद, आदर, समजूतदारपणा, सहानुभूती आणि नीट ऐकून घेण्याचं कौशल्य असावं. दिनेशच्या मते, गर्लफ्रेंडचा विनोदी, दयाळू आणि सकारात्मक दृष्टिकोन या 'रोल' साठी महत्त्वाचा आहे.
ही LinkedIn व्हायरल जॉब पोस्ट समोर येताच, कमेंट सेक्शनमध्ये मजेदार प्रश्नांचा पूर आला. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न होता, 'सॅलरी किती मिळेल?' काही लोकांनी विचारलं की, यासाठी CV आणि कव्हर लेटर देखील पाठवावं लागेल का? तर कुणी उपरोधिकपणे म्हटलं, 'आता समजले, माझ्या एक्सने ६ महिन्यांची इंटर्नशिप का केली होती.' एका युजरने मस्करीत लिहिलं, 'जर तुम्ही भारतीय असाल, तर प्रत्येक एप डेटिंग ॲप आहे.' आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पोस्टवर २६ लोकांनी चक्क अर्जही केला आहे.
