Join us

Lemon Price Hike Viral Photo : बोंबला! लिंबू महागले, आता लिंबू-मिर्ची कशी लावणार? लोकांनी 'असं' लावलं डोकं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:09 IST

Lemon Price Hike Viral Photo : उन्हाळ्यात जिथे लोकांना लिंबाची सर्वाधिक गरज असते, तिथे महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे.

वाढत्या महागाईने जनतेचे बजेट बिघडवलंय. महागाईचा चटका सर्वांनाच बसत आहे. आतापर्यंत दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी लोकं हैराण झाली होती. मात्र आता लिंबाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे उन्हाळ्यात लोकांचे हाल झाले आहेत.  उन्हाळ्यात जिथे लोकांना लिंबाची सर्वाधिक गरज असते (Lemon Price Hike) तिथे महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे. लिंबाच्या किमतीवर सोशल मीडियावर अनेक विनोदही केले जात आहेत. लोक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. (People started hanging garlic with chilli to avoid evil eye after lemon price hike ips gave funny reaction)

त्याचवेळी, आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मिरचीसोबत लिंबूऐवजी लसूण लटकलेले दिसत आहे. हे चित्र पाहून तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच आली असेल की मिरचीसोबत लिंबू असे टांगले जातात, मग इथे लसूण का दिसतो? कारण लिंबू इतका महाग आहे की वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी एवढा महागडा लिंबू विकत घेणे लोकांना कठीण जात आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेलच की लोक अनेकदा दुकाने आणि वाहनांवर लिंबू आणि मिरची टांगतात, जेणेकरून त्यांच्यावर वाईट नजर लागू नये.

 आश्चर्य! 12 वर्षांत 13 मिसकॅरेज, पण आई व्हायचं म्हणून तिनं परत जीव धोक्यात घातला आणि..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोसोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, वाढती महागाई पाहता लिंबू नसताना लसूणला प्रतिनियुक्तीवर टाकण्यात आले. लसणीने आज पदभार स्वीकारला. पोस्टवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले - पुढील आदेशापर्यंत हे प्रतिनियुक्ती सुरू राहील.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया