Lokmat Sakhi >Social Viral > Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 12:40 IST2021-10-11T12:30:06+5:302021-10-11T12:40:33+5:30

Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे.

Lakme Fashion Week 2021 : Bollywood actress malaika arora ramp walk in lakme fashion week 2021 goes viral | Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

बॉलिवूडमध्ये आयटम्स  साँग्सनी धुमाकूळ घालणारी मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. मलायका आपला स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोराच्या डिसेंट लूकमुळे कधी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे.

मलायका अरोराचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतला असून या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरानं (Malaika Arora) 'लॅक्मे फॅशन वीक 2021' (Lakme Fashion Week 2021 मध्ये  सगळयांनाच चकीत केलं. आज इवेंटचा ५ वा दिवस असून मयालका  डीवा डिजाइनर अन्नूसाठी शोस्टॉपर बनली.

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ब्रायडल लुकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.  या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या रिएक्शन्स देत आहेत. अभिनेत्रीने जड भरतकामासह जबरदस्त लाल आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसून येईल.

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, "कानात झुमके घातले नाहीत मॅडम." दुसऱ्याने लिहिले: "मॅडम तुम्ही माझे आयकॉन आहात. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात." मलायका अरोराच्या या  व्हिडिओला काही वेळात हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

मलायका अरोरा लवकरच इंडीयाज बेस्ट डान्सरच्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे. तिनं आपल्या खास गाण्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिनं 'चैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत. तिचे फिटनेस व्हिडिओ देखील खूप प्रसिद्ध आहेत. ती अनेकदा तिच्या लूक आणि स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते.  मागच्या काही वर्षांपासून मलायका अर्जुन कपूरसोबतच्या नात्याविषयी चर्चेत आहे.

Web Title: Lakme Fashion Week 2021 : Bollywood actress malaika arora ramp walk in lakme fashion week 2021 goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.