Join us

'तिने' आठवडाभर रोज जेवणात फक्त पास्ताच खाल्ला; आणि त्याचा परिणाम असा काही झाला की....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 14:22 IST

Social viral: तुम्हाला पास्ता आवडतो (pasta lover) का मग हे वाचाच... कारण आठवडाभर दररोज फक्त पास्ताच खाल्ल्याने काय होतं ते बघा.. 

ठळक मुद्देहा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा आहे, पण तरीही प्रचंड व्हायरल झाला असून सोशल मिडियावर कमाल करत आहे.

आपल्या खूप आवडीचा पदार्थ जेव्हा अचानक आपल्यासमोर येतो तेव्हा आपण अगदी आनंदून जातो.. हा पदार्थ वारंवार खायला मिळावा अशी सुप्त इच्छाही मनात असतेच.. कधी कधी असंही वाटतं की हा पदार्थ आपल्याला रोजच मिळाला तर काय मजा येईल.. असाच एक प्रयोग करून पाहिला आहे परदेशातल्या एका बाईंनी (pasta lover lady)... त्यांना पास्ता खूपच आवडतो म्हणून त्यांनी आठवडाभर रोज जेवणात पास्ताच खाल्ला.. आठवडा संपल्यानंतर त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे, ती वाचून लोकांना धक्काच बसला आहे..

 

या पास्ता प्रेमी महिलेचा व्हिडिओ selfmagazine या इन्स्टागाम (instagram) पेजवर शेअर करण्यात आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला ही महिला दररोज पास्ता खाताना दाखवली आहे तर व्हिडिओच्या शेवटी तिने आठवडाभर पास्ता (love for pasta) खाऊन तिला काय मिळालं हे सांगितलं आहे. हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा आहे, पण तरीही प्रचंड व्हायरल झाला असून सोशल मिडियावर कमाल करत आहे. आजवर या व्हिडिओला ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

 

आपल्याकडे असं म्हणतात की एखादा पदार्थ आपण अति खाल्ला किंवा रोजच खाल्ला तर काही दिवसांतच आपल्याला तो पदार्थ खाण्याची इच्छा उरत नाही. त्या पदार्थावरून आपलं मन उडून जातं आणि मग पुन्हा तो पदार्थ खावासाही वाटत नाही. पण इथे तर या बाईंचं काही वेगळंच झालं आहे. या बाईंप्रमाणेच काहीसं झालं होतं प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहॅम यांच्या पत्नीचं.. त्यांच्या पत्नीने म्हणे तिचा आवडता पदार्थ सलग २५ वर्षे खाल्ला.. तरीही तिला त्या पदार्थाचा अजिबातच तिटकारा आला नाही..

 

या पास्ता व्हिडिओमधल्या महिलेचंही तसंच आहे. या व्हिडिओमध्ये ती सांगते आहे की आठवडाभर तिने पास्ता खाल्ल्यानंतर आठवड्याच्याशेवटी तिला खूप खूप हॅप्पीनेस मिळाला.. ती खूपच आनंदी झाली.. बघा आता तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून असा प्रयोग करावा वाटला, तर अवश्य करा आणि काय मिळतं पहा.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामअन्न