Join us

वडील भारतीय म्हणून कोरिअन आई लेकाला अभिमानानं शिकवतेय भारताचं राष्ट्रगीत, पाहा त्यांचा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 16:31 IST

Korean Child Singing Indian National Anthem: कोरियाच्या या चिमुकल्याने बोबड्या सुरांत भारताचं राष्ट्रगीत म्हटलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.

ठळक मुद्देहा मुलगा आणि त्याची आई नेटिझन्सला भारीच आवडत असून त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळत आहेत. 

'जन- गण- मन' हे भारताचंराष्ट्रगीत (National Anthem of India) आपण जेव्हा म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याही नकळत अंगामध्ये देशभक्तीचं एक वेगळंच स्फूरण चढतं. हीच उर्जा आपल्या लेकालाही मिळावी, त्यालाही भारताच्याराष्ट्रगीताबाबत आत्मियता वाटावी, यासाठी एक कोरियन आई (Korean mother) तिच्या मुलाला भारताचं राष्ट्रगीत ('Jan-Gan-Man') शिकवते आहे. कोरियन आई आणि तिच्या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. premkimforever या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

 

हा जो कोरियन मुलगा आहे, त्याचं वय अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे असावं असं वाटतं. त्याच्या आईच्या ज्या काही वेगवेगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट आहेत,

समीरा रेड्डीची ३ वर्षांची लेक करून देतेय आईचं मॅनिक्युअर, मायलेकीचा सुंदर व्हिडिओ..

त्यावरून असं कळत आहे की या मुलाची आई कोरियन आणि वडील भारतीय आहेत. त्यामुळे त्याची आई कोरियन आणि भारतीय या दोन्ही संस्कृतीशी त्याची ओळख करून देऊ पाहते आहे. तिचा हा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे. राष्ट्रगीताच्या या व्हिडिओमध्ये आई राष्ट्रगीतातील एकेक शब्द उच्चारत आहे आणि तिच्या पाठोपाठ तो चिमुकल्या त्याच्या बोबड्या बोलांत राष्ट्रगीत म्हणतो आहे. राष्ट्रगीताच्या शेवटी त्याने म्हटलेलं जय हिंद ऐकायला खूपच गोड वाटतं.

 

या छोट्याशा मुलाचा आणखी एक छान व्हिडिओ आहे, ज्यात त्याला त्याच्या घरातली मंडळी हिंदी भाषा बोलायला शिकवत आहेत.

मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा 

कोणीतरी उच्चार करत आहे आणि त्यांच्या पाठोपाठ हा मुलगा मै एक लडका हूँ... मेरे पापा असे काही शब्द मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये बोलतो आहे. हा मुलगा आणि त्याची आई नेटिझन्सला भारीच आवडत असून त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलराष्ट्रगीतभारत