५०० रूपयांच्या कमीत कमी बजेटमध्ये किचनचा मेक ओव्हर करणं कठीण वाटू शकतं पण थोड्या कल्पकतेनं आणि स्मार्ट निवडीनं तुम्ही तुमच्या स्वंयपाकघराला एक नवा आणि फ्रेश लूक देऊ शकता. सर्वात आधी तुमच्या किचनमधील भिंती किंवा केबिनेटचा विचार करा (Kitchen Makeover Under 500). कमी खर्चात तुम्ही किचनला मोड्युलर आणि फ्रेश लूक देऊ शकता. यासाठी काही सोप्या युक्त्या पाहूया. (How To Renovate Kitchen In Low Budget)
वॉल स्टिकर्स आणइ काऊंटर टॉप
कमी बजेटमध्ये तुम्ही विनाइल वॉल स्टिकर्स, कॉन्टॅक्ट पेपर खरेदी करू शकता. हे स्टिकर्स संगमरवरी किंवा लाकडी फिनिशिंगमध्ये उपलब्ध असतात जे जुन्या प्लॅटफॉर्मवर किंवा कपाटांच्या दारावर लावल्यास किचनमध्ये लगेच आलिशान दिसू लागते. बाजारात किंवा ऑनलाईन साईट्सवर तुम्हाला २०० ते २५० रूपयांत विनाइल सेल्फ एडेसिव्ह वॉलपेपर मिळतात तर तुमचा किचनचा ओटा जुना झाला असेल तर त्यावर मार्बल फिनिश असलेला पेपर लावा. भिंतींवरील टाईल्स खराब झाल्या असतील मेझॅक पॅटर्नचे स्टिकर्स वापरून तुम्ही भिंतींना नवीन लूक देऊ शकता.
प्रकाश व्यवस्था
किचनमध्ये पुरेसा प्रकाश असल्या ते अधिक मोठे आणि स्वच्छ दिसते. १०० ते १५० रूपयात मिळणारे बॅटरी ऑपरेडेटे पुश लाईन्स तुम्ही कॅबिनेटच्या खाली लावू शकता. यामुळे काम करताना थेट प्लॅटफॉर्मवर उजेड येतो आणि किचन मॉडर्न दिसते. याशिवाय किचनमधील पसारा कमी करण्यासाठी तुम्ही ५० ते ६० रुपयांना मिळणारे एस शेप हूक किंवा भिंतीला चिकटवणारे हूक खरेदी करू शकता.
डिआयव्हाय
बजेट कमी असताना घरातील जुन्या वस्तूंना नवं रूप द्या. घरात असलेल्या काचेच्या बरण्यांना साध्या ऑईल पेंटने रंगवा किंवा त्यावर ज्युटची दोरी गुंडाळा. अशा ३ ते ४ बरण्या एकत्र ठेवल्यास त्या विंटेज दिसतात. उरलेल्या ५० ते १०० रूपयांत तुम्ही नर्सरीमधून एक छोटं मनी प्लांट किंवा स्नेक प्लांट आणू शकता. एका साध्या काचेच्या बाटलीत पाणी भरून त्यात मनी प्लांट लावून खिडकीत ठेवल्यास किचनमध्ये नैसर्गिक ताजेपणा येतो.
छोटे बदल
जुने, मळलेले, किचन नॅपकिन बदलून गडद रंगाचे नवीन नॅपकिन वापरा. हातानं बनवलेले छोटे कोस्टर किंवा रिकाम्या डब्यांपासून बनवलेले स्पून होल्डर किचनचा लूक बदलतात. अशा प्रकारे महागड्या डिझायनर्सची मदत न घेता फक्त ५०० रूपयांत तुम्ही किचनचं सौंदर्य खुलवू शकता.
