Join us  

Katrina kaif and vicky kaushal wedding : सब्यसाचीनं कतरिनासाठी वापरला जुनाच डिझायनर पॅटर्न? मसाबा गुप्ताचा सेम वेडींग लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 1:32 PM

Katrina kaif and vicky kaushal wedding : . नेटिझन्सचं लक्ष आता मसाबा गुप्ताच्या फोटोशुटवर गेलं आहे. मसाबासुद्धा या फोटोमध्ये कतरिनासारख्या लाल लेहेंगा आणि ज्वेलरी घातलेली दिसून येत आहे.

कतरिना आणि विक्कीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  इतर बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे कतरिनानंसुद्धा आपल्या लग्नात सब्यसाचीनं(Sabyasachi)  डिजाईन केलेला लेहेंग घालता होता.  सोशल मीडियावर कतरिनाच्या या चर्चेत असलेल्या लेहेंग्याची माहिती शेअर केली आहे. (Katrina kaif and vicky kaushal wedding)

दरम्यान या लेहेंग्यामध्ये कतरिना खास, खूप वेगळी दिसत नव्हती असं अनेकांचे म्हणणं आहे. नेटिझन्सचं लक्ष आता मसाबा गुप्ताच्या फोटोशुटवर गेलं आहे. मसाबासुद्धा या फोटोमध्ये कतरिनासारख्या लाल लेहेंगा आणि ज्वेलरी घातलेली दिसून येत आहे.

सब्यसाचीने शेअर केले कटरिनाच्या लेहेंग्याचे डिटेल्स  (Sabyasachi share details of katrina kaif lehenga)

फोटोशुटमध्ये मसाबानं जी ज्वेलरी घातली आहे, तीच ज्वेलरी कतरिनानं आपल्या लग्नाच्या दिवशी घातली होती. सब्यसाचीद्वारे डिजाईन केलेले ज्वेलरी डायमंडची असून यात २२ कॅरेट गोल्ड असल्याचं सांगितलं जात आहे. कतरिना पूर्ण लूक मसाबाप्रमाणे ठेवण्यात आला होता. लाल लेहेंग्यावर कटरीनानं लाल आणि गोल्डन रंगाच्या बांगड्या घातल्या होता. तर विक्कीचा लूक सब्यसाचीनं खूप सिंपल  ठेवला होता. ऑफ व्हाईट रंगाच्या शेरवानीवर गोल्डन जरीचे वर्क होते. तर शेरवानीचे बटन्सही गोल्ड प्लेटेट होते. 

जुलै २०२१ मध्ये मसाबा गुप्तानं हे फोटोशुट केलं होते. डिजायनरनं हे फोटोज आपल्या सोशल मीडया अकाऊंटवरून  शेअर केले आहे. याआधी दीपीका रणवीर, पत्रलेखा, अनुष्का शर्मा, विद्या बालन, सोहा अली खान या अभिनेत्रींनी सब्यसाचीद्वारे डिजाईन केलेले आऊटफिट्स लग्नासाठी निवडले. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलसब्यसाचीसोशल व्हायरलफॅशन