Lokmat Sakhi >Social Viral > नवऱ्यासाठी मी फक्त ट्रॉफी वाइफ! -करिश्मा कपूर घटस्फोट घेताना असं का म्हणाली होती?

नवऱ्यासाठी मी फक्त ट्रॉफी वाइफ! -करिश्मा कपूर घटस्फोट घेताना असं का म्हणाली होती?

karishma kapoor husband sanjay kapoor, divorce alleged abuse case and trophy wife blame, what is trophy wife? : करिश्मा कपूरच्या भूतपूर्व पतीचे निधन झाले, संजय कपूर आपल्याला ट्रॉफी वाइफ समजतो असं ती म्हणाली होती. त्या ट्रॉफी वाइफ शब्दाचा अर्थ काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:18 IST2025-06-13T18:15:04+5:302025-06-13T18:18:00+5:30

karishma kapoor husband sanjay kapoor, divorce alleged abuse case and trophy wife blame, what is trophy wife? : करिश्मा कपूरच्या भूतपूर्व पतीचे निधन झाले, संजय कपूर आपल्याला ट्रॉफी वाइफ समजतो असं ती म्हणाली होती. त्या ट्रॉफी वाइफ शब्दाचा अर्थ काय?

karishma kapoor husband sanjay kapoor, divorce alleged abuse case and trophy wife blame, what is trophy wife? | नवऱ्यासाठी मी फक्त ट्रॉफी वाइफ! -करिश्मा कपूर घटस्फोट घेताना असं का म्हणाली होती?

नवऱ्यासाठी मी फक्त ट्रॉफी वाइफ! -करिश्मा कपूर घटस्फोट घेताना असं का म्हणाली होती?

करिश्मा कपूरचंलग्न हे एक दुख:द प्रकरण. अभिषेक बच्चनशी केलेला साखरपुडा मोडला आणि पुढे २००३ साली तिचे दिल्लीस्थित उद्योगपती संजय कपूरशीलग्न झाले. (karishma kapoor husband sanjay kapoor, divorce alleged abuse case and trophy wife blame, what is trophy wife?) ते त्याचे दुसरे लग्न होते. पुढे घरगुती छळाची तक्रार दाखल करुन तिने घटस्फोट घेतला. माध्यमात त्याकाळी भयानक आरोप प्रत्यारोप झाले. हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे संजय कपूर यांचे हार्ट ॲटॅकने निधन झाले. मात्र  करिश्माने त्याकाळी डोमेस्टिक व्हायलन्सची केस करताना कोर्टात सांगितलं होतं की संजय मला ‘ट्रॉफी वाइफ’ समजतो.

तर ही ‘ट्रॉफी वाइफ’ संकल्पना काय आहे? जगभर हा शब्द अपमानास्पद म्हणून का वापरला जातो, कुठून आला..
प्रतिष्ठेचा खोटा दिखावा आणि नातं मात्र पोकळ अशी ही खरं तर सोपी गोष्ट. केवळ पैशाच्या जीवावर जशी एखादी गोष्ट विकत घेता येते आणि ती चारचौघात मिरवता येते तशीच वागणूक बायकोला दिली जाते. ट्रॉफी वाइफ म्हणजे एखादा श्रीमंत उद्योगपती किंवा वयाने, अधिकारानं मोठा पुरुष आपल्यापेक्षा  वयानं खूपच लहान, तरुण, आकर्षक महिलेशी लग्न करतो. लग्नाची बायको फक्त प्रतिष्ठेचा विषय असते. जशी कपाटात ट्रॉफी शोपिस म्हणून ठेवली जाते. तशी वागणूक बायकोला दिली जाते. दिखाव्याची वस्तू आणि बायको या दोन्ही गोष्टी समानच असतात. यात केवळ पुरुषीपणाचा अहंकार आणि एक प्रकारचा लिंगभेदही आहे. ही संकल्पना महिलांसाठी अत्यंत अपमानास्पद आहे असे मानले जाते. बाईची ओळख म्हणजे केवळ तिचं शरीर आणि सौंदर्य. त्यापलिकडे तिला ना ओळख ना अस्तित्व, त्याच्या मालकीची वस्तू असल्यासारखी तो तिला वापरतो किंवा फेकून देतो. 

समाजात आजही अनेक पुरुष बायकोकडे ट्रॉफी वाईफ म्हणून पाहतात. काहींना हे सारं आवडत नाही तर काहींना या टॅगबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. त्या ही ते मिरवणं एन्जॉय करतात. आर्थिक फायदे उकळतात. आताच्या काळात तर ट्रॉफी वाईफच नाही ट्रॉफी हजबंड ज्याला शुगर डॅडी म्हटले जाते. अशा अनेक संकल्पना आहेत.
नात्यांचे पेच असे पैसा आणि सत्तेच्या खेळात गुंतलेले असतात.

Web Title: karishma kapoor husband sanjay kapoor, divorce alleged abuse case and trophy wife blame, what is trophy wife?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.