Join us

करिना कपूरने कुणाला दाखवली थेट चप्पल? ठणकावून म्हणाली Prada नाही, ही माझी कोल्हापूरीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 12:49 IST

Kareena Kapoor About Her Kolhapuri Footwear And Prada: अभिनेत्री करीना कपूरने नुकताच तिच्या कोल्हापुरी चपलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता तो चांगलाच व्हायरल झाला...

ठळक मुद्दे या वादावर तिने तिच्या स्वत:च्या खास स्टाईलमध्ये मत व्यक्त केलं.

कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राची ओळख. तिचा बाज, रुबाब काही वेगळाच असतो. पारंपरिक वेशभूषा केली की त्यावर पायात घालायला सगळ्यात आधी आठवण येते ती कोल्हापुरी चपलेची. तुमचा महाराष्ट्रीयन पेहराव तर कोल्हापुरी चपलेशिवाय पुर्ण होतच नाही. आता ही चप्पल अवघ्या देशभरातच कोल्हापुरी म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशातले पर्यटकही हौशीने कोल्हापुरी घेऊन जातात. पण इटलीच्या Prada या फॅशन कंपनीने मध्येच एक वादळ उठवलं. त्यांनी काही दिवसांपुर्वी पुरुषांसाठी असणारं चपलांचं समर कलेक्शन लाँच केलं आणि त्यात चक्क आपल्या कोल्हापुरी चपलेसारखीच हुबेहूब चप्पल दिसली. हे पाहून जसा कित्येक भारतीयांना झटका बसला तसाच तो करीना कपूरलाही बसला.(Kareena Kapoor About Her Kolhapuri Footwear And Prada) 

 

म्हणूनच तर या वादावर तिने तिच्या स्वत:च्या खास स्टाईलमध्ये मत व्यक्त केलं. तिच्या अस्सल कोल्हापुरी चपलांचा एक मस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोमध्ये फक्त करीनाचे पाय आणि तिने घातलेली कोल्हापुरी चप्पल दिसते आहे.

तुमचा सगळा स्ट्रेस, थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

या तिच्या स्टोरीला तिने फोटो कॅप्शनही “Sorry not Prada but my OG Kolhapuri” असं एकदम साजेसं दिलं आहे. प्रादाचं हे कलेक्शन जेव्हा जगासमोर आणलं गेलं तेव्हा त्यांच्यावर कोल्हापुरी चप्पल कॉपी केली म्हणून प्रचंड टीका झाली.

 

त्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की त्यांनी ते डिझाईन कोल्हापुरी चप्पल पाहूनच तयार केलेलं आहे. आपली कोल्हापुरी Prada नावाने विकली जाणं भारतीयांना अजिबातच आवडलेलं नाही.

कारल्याचं झणझणीत भरीत खाऊन पाहिलं का? अजिबात कडू लागणार नाही- बच्चेकंपनीही आवडीने खाईल.. 

त्यामुळेच तर त्यांच्यावर सडकून टिका होत आहे. या वादामुळे आता कोल्हापुरी चप्पल आणि तिची मागणी पुन्हा एकदा वाढणार असं दिसून येतंय. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशनकरिना कपूरकोल्हापूरमहाराष्ट्र