Join us

kareena kapoor birthday : करीना आणि हार्वर्डमध्ये शिकायला, काहीही काय? 'अशी' होती तिच्या कुटुंबाची रिऍक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:53 IST

kareena kapoor birthday : करीना आणि हार्वर्डमध्ये शिकायला, कोण विश्वास ठेवेल?

करीना कपूर कपूर घराण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तींपैकी आहे.  सोशल मीडियावर करीना आपल्या व्हिडीओज आणि पोस्टमुळे तुफान चर्चेत असते. आज करीनाचा ४१ वा वाढदिवस (kareena kapoor birthday) आहे, यानिमित्तानं सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडायला सुरूवात झाली. अभियनाच्या क्षेत्रात डेब्यू करण्याआधी तिनं काही वेळासाठी कंप्यूटर स्टडीजसाठी प्रवेश घेतला होता. म्हणूनच आज करीनाच्या शैक्षणिक आयुष्यातील एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Rendezvous With Simi Garewal च्या एका एपिसोडमध्ये करीनानं हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एडमिशनबाबत सांगितले होते. या एडमिशननंतरची कुटुंबाची शॉकिंग रिएक्शन कशी होती याबाबतही तिनं सांगितले.  करीनाने सांगितले की, हार्वर्ड माझ्यासाठी आणि एक चांगला वेळ घालवण्यासाठी आणि मस्ती करण्यासाठी सुंदर क्षण होता. करीनाची आई बबीता कपूर आणि बहिण करिश्मा कपूर यांना करीनानं तीन महिन्यांसाठी हार्वर्डला जाऊ नये असं वाटत होतं. तरीसुद्धा करीनानं तिथे जाण्याचा निर्णय  घेतला.

कुटुंबाची रिएक्शन अशी होती

करीनानं फॉर्म भरले आणि हार्वर्डमध्ये मायक्रो कंम्प्यूटर्स एंड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी शिकायला गेली.  पुढे तिनं आपल्या कुटुंबाची रिएक्शनही सांगितली.  ती म्हणाली की, ''सगळे लोक असे बोलत  होते की, 'माझी भाची, माझी मेहूणी, माझी ही, ती... हार्वर्डला शिकण्यासाठी गेलीये. कपूर गर्ल डोकं तर नाहीये आणि हार्वर्डला शिकायला गेली.' सगळेचजण हे ऐकून ओव्हर रिएक्ट करत होते.  मी खरंच  हार्वर्डला शिकायला जातेय यावर कोणाचाच विश्वास नव्हता.''

नुकताच करीनानं  गणपती बाप्पासह आपल्या कुटुंबाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या गणोशोत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत गणेश चतुर्थी साजरी करताना दिसली.

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडसोशल व्हायरल