पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेत चिनी पद्धती आणि कल्चरचा स्वीकार करणं हा एक नवीन ट्रेंड बनला असून तो Gen Z च्या सोशल मीडिया फीडवर वेगाने व्हायरल होत आहे. अमेरिकेतील तरुणाई सकाळपासून 'तायची' (Tai Chi), चिनी भाषेचा अभ्यास आणि फॅशन स्टाईलपर्यंतच्या सर्व गोष्टींची कॉपी करत आहेत. 'चायनामॅक्सिंग' असं नाव असलेला हा हटके प्रकार आता ऑनलाईन वेगाने पसरत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोक चीनकडे कशा प्रकारे पाहतात, यात बदल घडवून आणत आहे.
काही तरुण पारंपारिक चिनी कपड्यांमध्ये फोटो काढत आहेत आणि एप्पल बॉईल वॉटर पिण्याचे व्हिडीओ शेअर करत आहेत. इतर काही जण त्यांच्या स्वयंपाकघरात 'तायची' किंवा 'बादुआनजिन' सारख्या व्यायामाचा सराव करताना दिसतात, तर काही जण घरात प्रवेश करण्यापूर्वी बूट काढण्यावर भर देत आहेत. बीजिंगमधील वयस्कर व्यक्ती किंवा ऑलिम्पिक खेळाडूंच्या शैलीतील लाल रंगाचे 'एडिडास ट्रॅकसूट' आणि घरातील चप्पल हा आता या नवीन लूकचा भाग बनला आहे.
अनेक युजर्सनी स्वतः चिनी भाषा शिकत असल्याचे व्हिडीओ पोस्ट केले असून #newlychinese हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. अमेरिकन न्यूज चॅनल्सवरही 'चायनामॅक्सिंग'ची चर्चा रंगली आहे. दक्षिण कोरियाच्या 'हॅल्यू'आणि 'के-पॉप' लाटेच्या उलट, चीनची लष्करी आणि आर्थिक ताकद त्याच्या सांस्कृतिक प्रभावाच्या खूप आधीपासून जगजाहीर होती. आता त्याची सांस्कृतिक ताकदही वेगाने पुढे येत आहे.
टोरंटोमधील एका महिलेने नाश्त्यात 'कांजी' खातानाचा व्हिडीओ शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "जर तुम्ही खरोखरच तुमच्या आयुष्यात चिनी जीवनशैलीचा आनंद घेत असाल, तर तुम्ही चीनचं फ्लाईट तिकीट का बुक करत नाही?"
केवळ अमेरिकनच चिनी जीवनशैलीचा स्वीकार करत आहेत असं नाही. सिंथिया नावाच्या एका मेक्सिकन महिलेने इन्स्टाग्रामवर लिहिलं, "चीनमधील माझा काळ आयुष्य बदलून टाकणारा होता आणि त्याने जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. चिनी संस्कृती, सौंदर्यशास्त्र आणि पर्यटनाची लोकप्रियता वाढताना पाहून मला आनंद होतोय."
चीनचे एक मुत्सद्दी आणि नायजेरियातील चिनी राजदूत यू डुनहाई यांनी 'X' वर पोस्ट केले की, 'चायनामॅक्सिंग' हा केवळ एक ट्रेंड नाही. ते म्हणाले, "जेव्हा खरा चीन जगासमोर येतो, तेव्हा जागतिक सहभागाचा एक नवीन अध्याय सुरू होतो." मात्र या ट्रेंडवर टीकाही होत आहे. 'आयडियाज बियॉन्ड बॉर्डर्स' या स्वयंसेवी संस्थेच्या सह-संस्थापक मेलिसा चेन यांनी 'X' वर लिहिलं की, ही घटना दिशाभूल करणारी आहे कारण 'चायनामॅक्सिंग' खऱ्या अर्थाने शक्य नाही.
त्यांनी टीका करताना म्हटलं, "का? कारण चीनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागांवर निर्बंध आहेत. तिथे व्हिसाव्यतिरिक्त अतिरिक्त परवाने, संचारबंदी आणि चेकपॉइंट्स आहेत. तुम्ही तिबेट, शिनजियांग, इनर मंगोलिया किंवा सिचुआन सारख्या भागात मुक्तपणे जाऊ शकता का ते सांगा. त्यामुळे तुम्ही 'चायनामॅक्सिंग' (Chinamaxxing) केले नाही, तर तुम्ही 'चायनामिनिंग' केलं आहे."
Web Summary : A 'Chinamaxxing' trend is gaining popularity, with Gen Z embracing Chinese culture. From Tai Chi to fashion, youths are adopting Chinese lifestyles. While some celebrate this cultural exchange, critics point out the restrictions within China, questioning the authenticity of the trend.
Web Summary : जेन जेड में 'चाइनामैक्सिंग' ट्रेंड लोकप्रिय हो रहा है, जिसमें युवा चीनी संस्कृति को अपना रहे हैं। ताई ची से लेकर फैशन तक, युवा चीनी जीवनशैली अपना रहे हैं। कुछ लोग इस सांस्कृतिक आदान-प्रदान का जश्न मनाते हैं, वहीं आलोचक चीन के भीतर प्रतिबंधों की ओर इशारा करते हैं।