lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

Jaya Bachhan Telling About Her Early Period Days: जया बच्चन सांगतात आऊट डोअर शुटिंगच्यावेळी पाळी आल्यावर किती बिकट परिस्थिती असायची, याचा किस्सा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 06:32 PM2023-12-25T18:32:23+5:302023-12-25T18:34:47+5:30

Jaya Bachhan Telling About Her Early Period Days: जया बच्चन सांगतात आऊट डोअर शुटिंगच्यावेळी पाळी आल्यावर किती बिकट परिस्थिती असायची, याचा किस्सा..

Jaya bachhan said about how tough it was to change sanitary pads behind bushes during outdoor shoots in her early days of carrier | जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

Highlightsआऊट डोअर शुटिंगच्यावेळी नेमकी काय परिस्थिती असायची आणि त्याकाळी झाडांचा कसा आधार घ्यावा लागायचा, याविषयी जया बच्चन यांनी सांगितलेली त्यांची खरीखुरी गोष्ट...

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा त्या अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. साधारणपणे पाळी येण्याचा किंवा नुकतीच सुरू झाली असण्याचा हा काळ असतो. पाळीला जेव्हा सुरुवात झालेली असते तेव्हा सुरुवातीच्या काही वर्षांत मुलींना खूप लाज वाटते. आपली पाळी सुरू आहे, हे इतरांना कळलं तरी त्यांना भयंकर ऑकवर्ड होत असतं. साधारण अशाच वयोगटात जेव्हा जया बच्चन होत्या तेव्हा त्याकाळात आऊट डोअर शुटिंगच्यावेळी नेमकी काय परिस्थिती असायची आणि त्याकाळी झाडांचा कसा आधार घ्यावा लागायचा, याविषयी जया बच्चन यांनी सांगितलेली त्यांची खरीखुरी गोष्ट...(Jaya bachhan said about how tough it was to change sanitary pads behind bushes during outdoor shoots)

 

जया बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्ट कार्यक्रमात तिने आपल्या आजीला प्रश्न विचारला की त्यांची पाळी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती कशी होती...

तेलाची किटली खूपच तेलकट- चिकट झाली? २ सोपे उपाय- किटली चटकन होईल स्वच्छ 

यावर जया बच्चन यांनी "it was terrible" अशा शब्दांतच त्यांच्या पाळीचा किस्सा सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की जेव्हा आम्ही आऊटडोअर शुटिंगसाठी बाहेर असायचो आणि तेव्हा पाळी यायची, तेव्हा तिथे आतासारख्या व्हॅनिटी व्हॅन तर सोडाच पण टॉयलेट- बाथरुम अशी कोणतीही सोय नसायची.

 

त्यामुळे मग सॅनिटरी पॅड बदलण्यासाठी आम्ही झाडांच्या मागे जायचो. पॅड बदललं की ते वापरून झालेलं पॅड बदलण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या सोबत ठेवाव्या लागायच्या आणि ते सगळं घरीजाईपर्यंत स्वत:सोबत ठेवावं लागायचं. कारण तिथे कुठेही ते पॅड टाकण्याची सोय नसायची.

इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायच्या? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत बघा सुंदर पार्टीवेअर हिल्स

जया यांचा हा किस्सा ऐकून त्यांची नात तर थक्कच झाली. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही सांगितलं होतं की तिच्या करिअरच्या सुरुवातीलाही आऊटडोअर शुटिंगच्या वेळी टॉयलेट, बाथरुम सुविधा, कपडे बदलण्यासाठीची सोय नसायची. जया बच्चन ते दिया मिर्झा या दोघींच्या करिअरमध्ये एवढ्या वर्षांचा गॅप असला तरी परिस्थितीमात्र बऱ्यापैकी समानच होती, हेच यावरून दिसून येतं.

 

Web Title: Jaya bachhan said about how tough it was to change sanitary pads behind bushes during outdoor shoots in her early days of carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.