Join us

३ वस्तू किचनमध्ये नेणं फार धोक्याचं, चप्पल घालत असाल तर आताच ही सवय बदला कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2025 19:41 IST

It is very dangerous to take 3 things into the kitchen : किचममध्ये हमखास या वस्तू तुम्ही नेता. पण पाहा त्या नेणे योग्य आहे का ?

आपण स्वयंपाकघरामध्ये गरजेच्या असणार्‍या वस्तूंची यादी काढतो. त्यानुसारच वस्तू स्वयंपाक घरामध्ये आणतो. (It is very dangerous to take 3 things into the kitchen)स्वयंपाकघरामध्येच अन्न तयार केले जाते त्यामुळे ती जागा स्वच्छ असणे फार गरजेचे असते. त्यासाठी विविध उपाय आपण करत असतो. किचनमध्ये एक झुरळ जरी दिसलं तरी आपण लगेच त्याला बाहेर काढण्यासाठी उपाय शोधायला लागतो. एवढी सगळी काळजी घेता मात्र तरीही काही हानिकारक वस्तू स्वयंपाकघरामध्ये येतातच. (It is very dangerous to take 3 things into the kitchen)तुम्ही स्वत:च घेऊन जाता. या काहीही अपायकारक वस्तू नाहीत, मात्र स्वयंपाकघरामध्ये त्या ठेवणे धोक्याचे ठरु शकते. 

जाणून घ्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या स्वयंपाकघरापासून लांबच ठेवलेल्या बऱ्या असतात. हातासरशी काही वस्तू आपण ओट्यावर किंवा मग अन्नाच्या शेजारी ठेऊन देतो. त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. 

१. आजकाल गाडी प्रत्येकाच्या दारात असते. चारचाकी असेच असे नाही मात्र दुचाकी अनेकांकडे असते. गाडीच्या चवीचा गुच्छा आपण बरोबर घेऊन फिरतो. खिशामध्ये ठेवतो. घरी आल्यानंतर पाणी प्यायला किचनमध्ये जातो आणि चावी काढून ओट्यावर ठेवतो. गाडीच्या चावीभर धूळ बसलेली असते बॅक्टेरिया असतो. त्यामुळे गाडीची चावी किचनमध्ये नेणे टाळा. तसेच लहान मुलांनाही चावीशी खेळायला देऊ नका. मुले चावी तोंडात घालतात त्यामुळे आजारपण येऊ शकते. 

२. फरफ्यूम वापरणे सेंट तसेच डीओ वापरणे फार कॉमन आहे. त्यामध्ये अल्कोहोल असते. किचनमध्ये या बॉटल्स आपण नेतो. तिथे उभे राहून फवारतोही. अन्नासाठी हा स्प्रे चांगला नाही. किचनमध्ये गॅस चालू असतो त्यामुळे तेथील तापमान वाढलेले असते. परफ्यूमचा फवारा उच्च तापमानात करणे धोकादायक ठरु शकते.   

३. आजकाल घरामध्ये चपल घालणे अगदी कॉमन आहे. पायाला धूळ माती लागू नये यासाठी या चपला वापरल्या जातात. मात्र किचनमध्ये त्या नेणे चांगले नाही. त्या चपला घरभर फिरल्या असतात. तसेच कधी तरी पटकन बाहेरही वापरल्या जातात. त्यावर बॅक्टेरिया असतो. त्यामुळे किचनमध्ये पायाखाली कापड ठेवा. चपल वापरु नका.  

टॅग्स :किचन टिप्सहेल्थ टिप्सअन्न