Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > घरी एसी कुलर नसतानाही घर थंड ठेवता येणे सहजच शक्य आहे - करा हे ६ उपाय , घर तापणार नाही

घरी एसी कुलर नसतानाही घर थंड ठेवता येणे सहजच शक्य आहे - करा हे ६ उपाय , घर तापणार नाही

It is easily possible to keep your house cool even without an AC cooler - follow these 6 tips, your house will not get hot : उन्हाळ्यासाठी खास टिप्स. घर ठेवा थंडगार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2026 14:19 IST2026-03-15T14:18:25+5:302026-03-15T14:19:42+5:30

It is easily possible to keep your house cool even without an AC cooler - follow these 6 tips, your house will not get hot : उन्हाळ्यासाठी खास टिप्स. घर ठेवा थंडगार.

It is easily possible to keep your house cool even without an AC cooler - follow these 6 tips, your house will not get hot | घरी एसी कुलर नसतानाही घर थंड ठेवता येणे सहजच शक्य आहे - करा हे ६ उपाय , घर तापणार नाही

घरी एसी कुलर नसतानाही घर थंड ठेवता येणे सहजच शक्य आहे - करा हे ६ उपाय , घर तापणार नाही

बाहेर उन्हाचा कडाका वाढू लागला की घरात उकाडा जाणवायला लागतो. दुपारच्या वेळेस घरातील भिंती, मजले आणि छप्परही तापतात, त्यामुळे घरात बसणं कठीण वाटतं. सतत गरम वातावरणात राहिल्यामुळे थकवा, चिडचिड आणि बेचैनीही वाढू शकते. पण काही सोप्या सवयी आणि घरगुती उपाय केल्यास घरातला उकाडा बराच कमी करता येतो आणि घरात थोडा फार थंडावा टिकवून ठेवता येतो.

सर्वात आधी घरात हवा खेळती ठेवणं महत्त्वाचं असतं. सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्य मावळत असताना बाहेरची हवा तुलनेने थंड असते. त्या वेळेत घरातील खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवले तर ताजी हवा घरात येते आणि घरातील उकाडा कमी होण्यास मदत होते. मात्र दुपारच्या वेळेस सूर्य प्रखर असताना खिडक्या बंद ठेवून त्यांना पडदे किंवा जाडसर कर्टन लावले तर बाहेरची गरम हवा आणि उन्हाचा तडाखा थेट घरात येत नाही.

उन्हाळ्यात घरात फिकट रंगांचे पडदे, चादरी किंवा बेडशीट वापरणंही फायदेशीर ठरतं. पांढरे, क्रीम, फिकट निळे किंवा हलके रंग उष्णता कमी शोषतात. उलट गडद रंग उष्णता जास्त धरून ठेवतात, त्यामुळे घर अधिक गरम वाटू शकतं. शक्य असेल तर कॉटनचे पडदे आणि चादरी वापराव्यात. कॉटनचे कापड हलकं असल्यामुळे घरात हवा खेळती राहते आणि उकाडा कमी जाणवतो.

घरातील जमिनीवर किंवा अंगणात अधूनमधून पाण्याचा हलका शिडकावा केल्यासही वातावरण थोडं गार वाटतं. ग्रामीण भागात अजूनही अंगणात पाणी टाकण्याची पद्धत दिसते. पाण्यामुळे जमिनीची उष्णता कमी होते आणि आसपासचा भाग थोडा थंड वाटतो. गॅलरी किंवा खिडकीजवळ पाण्याने ओला केलेला कापडाचा पडदा लावला तरी त्यातून येणारी हवा थोडी गार वाटते.

घरात झाडं ठेवणं हा देखील एक चांगला आणि नैसर्गिक उपाय आहे. लहान कुंड्यांमध्ये मनी प्लांट, अरेका पाम, स्नेक प्लांट किंवा इतर घरात वाढणारी झाडं ठेवली तर घरातील वातावरण ताजं राहायला मदत होते. झाडांमुळे हवा स्वच्छ राहते आणि घरात थोडासा नैसर्गिक थंडावाही जाणवतो.

तसेच उन्हाळ्यात घरात जास्त उष्णता निर्माण करणारी उपकरणं शक्यतो कमी वापरणंही फायदेशीर ठरतं. ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा सतत चालू असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं घरातील तापमान वाढवू शकतात. त्यामुळे शक्य असेल तर स्वयंपाक सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करणे अधिक योग्य ठरते.

याशिवाय घराच्या छतावर किंवा गच्चीवर पांढरा रंग किंवा उष्णता कमी करणारा कोटिंग लावला तर उन्हाची उष्णता कमी प्रमाणात घरात पोहोचते. काहीजण छतावर कुंड्यांमध्ये झाडं ठेवतात किंवा पाण्याचा हलका शिडकावा करतात, त्यामुळे छत जास्त तापत नाही.
 

 

Web Title : बिना एसी घर को ठंडा रखें: 6 आसान उपाय

Web Summary : गर्मी से राहत! ठंडी हवा में वेंटिलेशन, हल्के रंग के कपड़े, पानी का छिड़काव, पौधे और गर्मी पैदा करने वाले उपकरणों को कम करके घर को प्राकृतिक रूप से ठंडा रखें। आरामदायक गर्मी के लिए सरल सुझाव।

Web Title : Keep Your Home Cool Without AC: 6 Simple Tips

Web Summary : Beat the heat! Keep your home cool naturally by ventilating during cooler hours, using light-colored fabrics, sprinkling water, adding plants, and minimizing heat-generating appliances. Simple tips for a comfortable summer.