Lokmat Sakhi >Social Viral > बाथरुममध्ये कुबट वास येतो ? नाक बंद करुन जायची आता गरज नाही, करा हे ३ उपाय

बाथरुममध्ये कुबट वास येतो ? नाक बंद करुन जायची आता गरज नाही, करा हे ३ उपाय

Is there a musty smell in the bathroom? No need to hold your nose anymore, try these 3 solutions : दुर्गंध कमी करण्यासाठी प्रभावी उपाय. नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 12:50 IST2025-08-28T12:49:49+5:302025-08-28T12:50:58+5:30

Is there a musty smell in the bathroom? No need to hold your nose anymore, try these 3 solutions : दुर्गंध कमी करण्यासाठी प्रभावी उपाय. नक्की करुन पाहा.

Is there a musty smell in the bathroom? No need to hold your nose anymore, try these 3 solutions | बाथरुममध्ये कुबट वास येतो ? नाक बंद करुन जायची आता गरज नाही, करा हे ३ उपाय

बाथरुममध्ये कुबट वास येतो ? नाक बंद करुन जायची आता गरज नाही, करा हे ३ उपाय

बाथरुममध्ये अनेकदा कुबट, घाणेरडा वास येतो आणि तो खूप त्रासदायक वाटतो. कारण अंघोळ करतानाही त्या वासामुळे प्रसन्न वाटत नाही. उलट पोटात मळमळ सुरु होते. (Is there a musty smell in the bathroom? No need to hold your nose anymore, try these 3 solutions)या वासामागचे प्रमुख कारण म्हणजे ड्रेनेज पाइपमध्ये अडकलेली घाण, केस, साबणाचे थर आणि ओलसरपणामुळे वाढणारे जंतू. तसेच बाथरुम वापरल्यावर पाण्याचा योग्य वापर करत साफसफाई न करणे. सतत ओलसर वातावरण असल्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया लवकर वाढतात आणि त्यातून कुबट वास निर्माण होतो. काही वेळा पाण्याचे साचलेले थेंब, योग्य वायुविजन नसणे किंवा शौचालयातील पाण्याची टाकी व्यवस्थित न साफ करणे ही कारणेदेखील वास टिकून राहण्यास कारणीभूत ठरतात.

१. या समस्येवर घरगुती उपाय करता येतात. सर्वात सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून किमान एकदा बाथरुम नीट कोमट पाण्याने आणि साध्या डिटर्जंटने धुवणे. गरम पाण्याचा वापर केल्यावर दुर्गंधी लवकर कमी होते. 

२. कोरड्या जागी लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा टाकल्यास वास कमी होतो आणि जंतूंची वाढ रोखली जाते. ड्रेनेज पाइपमध्ये थोडा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घालून काही मिनिटांनी गरम पाणी ओतल्यास अडकलेली घाण कमी होते. आणि पाइपमधील वास कमीही होतो. दररोज बाथरुम वापरल्यानंतर खिडकी उघडी ठेवणे किंवा एग्झॉस्ट फॅन चालू ठेवणे महत्त्वाचे असते, कारण जागा हवेशीर असल्यावर हवेतील ओलावा कमी होतो. जमिनीवर साचलेले पाणी वेळोवेळी पुसून टाकल्यास बुरशी तयार होत नाही.

३. याशिवाय लवंग, कपूर किंवा लिंबाच्या साली ठेवूनही बाथरुममधील वास बराचसा कमी करता येतो. हे नैसर्गिक सुगंध आहेत आणि त्यामुळे हवा शुद्ध करण्यासाठी त्यांचा फायदा होतो. बाथरुममध्ये वास येण्याची मूळ कारणे म्हणजे अडकलेली घाण, जंतू आणि ओलसरपणा ही असून नियमित स्वच्छता, हवेशीरपणा आणि सोपे घरगुती उपाय करुनही हा त्रास सहज टाळता येतो. तसेच कमोड असेल तर वास जास्त वेळ हवेत राहतो. त्यासाठी कमोड साफ करण्यासाठी मिळणाऱ्या गोळ्या वापरा. पॉटमध्ये लहान गोळी टाकायची आणि वास येणे थांबते. हे उपाय नक्की करुन पाहा. 

Web Title: Is there a musty smell in the bathroom? No need to hold your nose anymore, try these 3 solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.