Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टची बटणं उजव्या बाजूला का असतात? पाहा इंटरेस्टिंग कारण..

महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टची बटणं उजव्या बाजूला का असतात? पाहा इंटरेस्टिंग कारण..

Interesting Facts : महिला आणि पुरूषांच्या शर्टची बटणं वेगवेगळ्या साइडला असण्यामागे वेगवेगळे तर्क दिले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:41 IST2026-01-28T16:24:18+5:302026-01-28T17:41:21+5:30

Interesting Facts : महिला आणि पुरूषांच्या शर्टची बटणं वेगवेगळ्या साइडला असण्यामागे वेगवेगळे तर्क दिले जातात.

Interesting Facts : Women shirts buttons placed only on left side know why | महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टची बटणं उजव्या बाजूला का असतात? पाहा इंटरेस्टिंग कारण..

महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टची बटणं उजव्या बाजूला का असतात? पाहा इंटरेस्टिंग कारण..

Interesting Facts : अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, रोज दिसणाऱ्या गोष्टी कितीतरी वेळा आपल्या डोळ्या समोरून जात असतात. पण आपण त्यांच्याकडे फारसं लक्षच देत नाही. कारण आपण या गोष्टी रोज-रोज बघतो त्यामुळे सामान्य वाटतात. अशीच एक बाब म्हणजे आपण महिला आणि पुरूषांच्या शर्टच्या बटणंची साईड वेगवेगळी असते. म्हणजे महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला आणि पुरूषांच्या शर्टची बटणं उजव्या साइडला असतात. चला जाणून घेऊन यामागचं कारण...

शर्ट घालणं आणि त्यांचे बटणं लावणं हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. महिला आणि पुरूषांच्या शर्टची बटणं वेगवेगळ्या साइडला असण्यामागे वेगवेगळे तर्क दिले जातात. असं म्हटलं जातं की, पुरूषांना शर्टची बटणं उघडण्यासाठी किंवा लावण्यासाठी डाव्या हाताचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या शर्टमध्ये उजव्या बाजूला बटणं असतात. तेच महिलांच्या शर्टमध्ये डाव्या बाजूला बटन असतात. अनेक इतिहासकारांनी असा तर्क दिला की, पुरूषांसाठी उजव्या हाताने आपल्या शस्त्रापर्यंत पोहोचणं सोपं होत होतं. ज्यामुळे उजव्या बाजूला बटणं लावली जात होती. जेणेकरून हाताने शर्ट आणि जॅकेटमधील हत्यार सहजपणे काढता यावे.

महिला आपल्या बाळांना कडेवर घेण्यासाठी डाव्या हाताचा वापर करतात. त्यामुळे महिल्यांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूने दिले जातात. जेणेकरून त्या उजव्या हाताने शर्ट किंवा ब्लाउजचं बटणं उघडून बाळांना स्तनपान करू शकतील. एक तर्क असाही दिला जातो की, जुन्या काळात महिला घोडेस्वारी करत होत्या आणि त्यावेळी त्या डावीकडे बटणं असलेले शर्ट वापरत होत्या. जेणेकरून हवेमुळे त्यांच्या शर्टची बटणं उघडू नये. नंतर हीच कॉन्सेप्ट कायम ठेवली गेली आणि कपडे बनवणाऱ्या लोकांनी अशाप्रकारेच शर्ट बनवने सुरू केले.

दुसरा एक तर्क दिला जातो की, महिला आणि पुरूषांच्या शर्टची बटणं वेगळ्या साइडला असण्याचा किस्सा नेपोलियन बोनापार्टशी संबंधित आहे. नेपोलियन बोनापार्टना त्याचा उजवा हात आपल्या शर्टच्या आत ठेवणं पसंत होतं. त्यानंतर अनेकांनीही त्यांचीही ही स्टाइल फॉलो करणं सुरू केलं. असे म्हणतात की, हे नेपोलियन बोनापार्ट यांना अजिबात आवडलं नाही. ज्यानंतर त्यांनी आदेश काढला की, आतापासून महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूने असतील.

Web Title : पुरुषों और महिलाओं के शर्ट के बटन अलग-अलग क्यों होते हैं?

Web Summary : कभी सोचा है कि पुरुषों और महिलाओं के शर्ट के बटन विपरीत दिशाओं में क्यों होते हैं? पुरुषों के लिए हथियार तक आसान पहुँच से लेकर महिलाओं के लिए स्तनपान कराने की सुविधा और यहाँ तक कि नेपोलियन के फरमान तक, कई सिद्धांत हैं।

Web Title : Why are buttons on shirts different for men and women?

Web Summary : Ever wondered why men's and women's shirt buttons are on opposite sides? Theories range from ease of weapon access for men to breastfeeding convenience for women, and even Napoleon's decree.