Space Between Nose and Lips: मानवी शरीर हे एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. कारण या देहात इतक्या गोष्टी दडलेल्या असतात ज्यांबाबत आपल्याला अनेकदा माहिती सुद्धा नसते. वरवर दिसणाऱ्या गोष्टींची नावं माहीत असतात. जसे की, नाक, कान, डोळे, ओठ, केस, हात, पाय, बोटे इत्यादी इत्यादी...पण असेही काही अवयव असतात जे आपण रोज बघतो, पण त्यांबाबत आपल्याला काहीच कल्पना नसतं. अनेक अवयव असे असतात, ज्यांची नावं आपल्याला माहीत नसतात. असाच एक खास आणि रोज बघितला जाणारा अवयव म्हणजे नाक आणि ओठ यांच्या मधला भाग. इथे एक खाच असते. या जागेला नेमकं काय म्हणतात आणि तिचं काम काय असतं, हे आज आपण पाहणार आहोत.
रोज वेगवेगळ्या संशोधनातून मानवी शरीराबाबत अनेक नवीन गोष्टी समोर येत असतात. ज्या आपल्याला सोडा वैज्ञानिकांनाही माहीत नसतात. वैज्ञानिक सतत रिसर्च करत अनेक गोष्टी जाणून घेत असतात. तर अजूनही अनेक गोष्टी त्यांच्यासाठी कोड्यासारख्या आहेत. आपणही कधीच चेहऱ्यावरील या भागाचा विचार केला नसेल. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत.
मनुष्याच्या चेहऱ्यावर डोळे, कान, नाक, तोंड, ओठ, गाल आणि कपाळ हे सगळे अवयव दिसतात. ही नावंही आपल्याला पाठ असतात. पण नाक आणि ओठाच्या मधल्या भागाबाबत काही खास नाव सहजा कुणी उच्चारताना ऐकायला मिळत नाही. पण आपल्याला कल्पना नसेल की, या भागालाही एक नाव आहे. मात्र, त्याचा वापर कुणी करत नाही. कारण त्यांना ते नावच माहीत नसतं.
नाक आणि ओठाच्या मधल्या भागाचं नाव काय?
नाक आणि ओठांच्या मधल्या भागाला फिल्ट्रम म्हटलं जातं. हा एक इंग्रजी शब्द आहे आणि याचा असाच वापर केला जातो. मराठी याला 'ओष्ठ अटनी' असा शब्द वापरला जातो. तर हिंदीत याचा अर्थ 'ओष्ठ खात' म्हणजे ओठांच्या आधीचा भाग. काही लोकांमध्ये ही मधली खाच खोल तर काहींमध्ये उथळ असते. एफडीएनए हेल्थ वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, ज्या लोकांचं फिल्ट्रम खोल किंवा लांब असतं, त्यांना एखादा दुर्मीळ आजार किंवा जेनेटिक सिंड्रोमही असू शकतो.
फिल्ट्रमचा आकार आई-वडिलांच्या फिल्ट्रमच्या आकारावरही अवलंबून असतो. आता याबाबत विचार करण्यासारखी बाब ही आहे की, चेहऱ्या इतर त्वचेसारखा हा भाग सपाट का नसतो? खाच का असते? याचं कारण चेहऱ्या त्वचा आकुंचन पावून या जागेवर येऊन बसते. ही अतिरिक्त त्वचा वरचं ओठ आणि स्नायू हलवण्याचं काम करते. अमेरिकेच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार ओरल मूव्हमेंट किंवा वरचं ओठ हलवण्यासाठी फिल्ट्रमची त्वचा मदत करते.
