Lokmat Sakhi >Social Viral > वो स्त्री है.. ! बॉसने प्रमोशन नाकारले, तिने कंपनी विकत घेऊन बॉसला शिकवला ' असा ' धडा..

वो स्त्री है.. ! बॉसने प्रमोशन नाकारले, तिने कंपनी विकत घेऊन बॉसला शिकवला ' असा ' धडा..

Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson : बदला घ्यावा तर असा. पाहा एका महिलेने बॉसला कसा धडा शिकवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2025 17:16 IST2025-09-03T17:13:45+5:302025-09-03T17:16:50+5:30

Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson : बदला घ्यावा तर असा. पाहा एका महिलेने बॉसला कसा धडा शिकवला.

Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson | वो स्त्री है.. ! बॉसने प्रमोशन नाकारले, तिने कंपनी विकत घेऊन बॉसला शिकवला ' असा ' धडा..

वो स्त्री है.. ! बॉसने प्रमोशन नाकारले, तिने कंपनी विकत घेऊन बॉसला शिकवला ' असा ' धडा..

आज महिला सगळ्या क्षेत्रात जरी पुढे असल्या तरी त्यांचे पाय खेचणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. अनेकदा भारतातच नाही तर सगळीकडेच ही समस्या महिलांना अनुभवावी लागतेच. काही जणी खचतात तर काही त्याचे चोख उत्तर देतात. अमेरिकेतली एका उद्योगपती महिलेने तिचा अनुभव Matthews Mentality Podcast मध्ये सांगितला. प्रत्येकाने ऐकावा असा अनुभव आहे. धोका देणाऱ्यांना अद्दल कशी घडवावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे जुलिया ए. स्टीवर्ट. ७० वर्षीय जुलिया अमेरिकेतली खाद्य क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व आहे. मात्र तिथे पोडचण्याचा संघर्ष ज्युलियाने सांगितला. (Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson)अॅपलबी या कंपनीत काम करत होती. तेथील वरिष्ठांनी दिलेले टार्गेट पूर्ण केल्यावर ज्युलियाला सीईओ पद देण्याचे वचन दिले होते. जुलियाने तिचे काम उत्तमरित्या पार पाडले मात्र तिला धोका दिला गेला. 

तिला सीईओ पोस्ट कधीच मिळणार नाही असे तिच्या बॉसने सांगितले. त्यावर जुलियाने विचारले यंदा नाही तर पुढच्या वर्षी? त्यावर तिला मिळालेले उत्तर असे होते की कधीच नाही. ज्युलियाने कारण विचारले. मात्र तिच्या वरिष्ठांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. कंपनीसाठी ज्युलियाने बरेच काही केले होते. तिच्यामुळे कंपनीची प्रगती झाली होती. या प्रकारा नंतर जुलियाने नोकरी सोडली आणि IHOP ही कंपनी जॉईन केली. जुलियाने तिथेही सोनंच केलं. 

हळूहळू काम वाढले. प्रगती वाढली आणि बघताबघता जुलियाच्या कंपनीने अॅपलबी कंपनीच विकत घेतली. सगळ्या विधी पूर्ण केल्या आणि त्या कंपनीची दोरी आता जुलियाच्या हातात होती. सारी कामे संपल्यावर जुलियाने तिच्या बॉसला आणि इतर काही लोकांना बोलवून घेतले. जुलियाच्या बॉसला तर धक्काच बसला, त्याची नोकरी जाणार हे निश्चित होते. जुलियाने तिला धोका दिलेल्या सगळ्यांना नोकरीवरुन काढले. 

बदला घ्यावा तर असा. नोकरी के बदले नोकरी असा नियम पाळून जुलियाने तिची योग्यता सिद्ध केली. जुलियाला तिच्या विश्वासू माणसांनी धोका दिल्यावर तिने खचून न जाता, जिद्दीने आणि धीराने काम केले. महिलांनी अशा महिलांचा आयुष्यात नक्कीच आदर्श ठेवायला हवा. 

Web Title: Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.