lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट

शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट

Indian woman gets US citizenship at the age of 99, netizens question American dream : ९९ वर्षे पूर्ण होता होता अमेरिकन सिटिझनशिप मिळाली पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2024 01:34 PM2024-04-08T13:34:11+5:302024-04-08T13:35:45+5:30

Indian woman gets US citizenship at the age of 99, netizens question American dream : ९९ वर्षे पूर्ण होता होता अमेरिकन सिटिझनशिप मिळाली पण..

Indian woman gets US citizenship at the age of 99, netizens question American dream | शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट

शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट

शिक्षण, ट्रॅव्हल, यासह इतर गोष्टी करण्यासाठी वयाची मर्यादा लागत नाही असे म्हणतात. काही लोक वय बघून पुढच्या गोष्टी करतात. पण मनात इच्छा असल्यास वय कशाला पाहावं ना? काही लोक मनसोक्त जगतात. मनसोक्त जगणारी माणसं वयाचा विचार करीत नाही. अशाच एका महिलेला वयाच्या ९९ व्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले असून, तिने या संदर्भात आनंद सोशल मीडियात व्यक्त केला आहे (American Citizenship).

९९ वर्षीय महिलेचं नाव डायबाई असून, तिचा जन्म १९२५ रोजी भारतात झाला आहे. ती सध्या तिच्या मुलीसोबत ऑर्लँडोमध्ये राहते (Social Viral). त्या देशाचे सौंदर्य आणि बऱ्याच गोष्टी पाहून, तिला यादेशाचे नागरिक होण्याची इच्छा झाली(Indian woman gets US citizenship at the age of 99, netizens question American dream).

३ मुलांची आई खांबावर जाऊन बसली; अजब तिची मागणी म्हणते ‘दोघांसोबत’ राहीन कारण..

यू.एस. सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस ऑफिशियल यांनी ट्विटरवर डायबाईला अमेरिकेचे नागरिकत्व देतानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी 'डायबाई या भारतीय नागरिक आहेत, आणि त्या अमेरिकेच्या नागरिकत्वाची शपथ घेण्यास उत्सुक आहेत.' सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये डायबाई व्हीलचेअरमध्ये बसलेली आहे. तिच्यासोबत मुलगी आणि युएससीआयएस अधिकारी उभे आहेत. शिवाय डायबाईच्या हातात नैसर्गिकीकरणाचे प्रमाणपत्र आहे. मुख्य म्हणजे नागरिकत्व मिळाल्यानंतर डायबाई अत्यंत आनंदित दिसत आहे.

नेटकऱ्यांनी कमेण्ट करीत विचारले प्रश्न

बर्नर अर्धवटच पेटते? फक्त १ लिंबू आणि १० रुपये खर्चात बर्नर होईल चकाचक, स्वयंपाक झटपट

अनेक लोक डायबाईंना अमेरिकन नागरिकत्व मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी नागरिकत्वाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका एक्स वापरकर्त्याने सवाल उपस्थित करत 'अमेरिकेचे नागरिकत्व देण्याच्या प्रक्रियेला इतका वेळ का लागला.' तर दुसऱ्याने 'भारतीय महिला फ्लोरिडामध्ये तिच्या मुलीसह अनेक वर्षांपासून राहत आहे, तरी देखील नागरिकत्व मिळण्यास इतका विलंब का लागला?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Web Title: Indian woman gets US citizenship at the age of 99, netizens question American dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.