Join us

ऑफिस घरापासून 350 किमी दूर, मुलांसाठी रोज विमानानं येणं-जाणं करते ही 'सुपर-मॉम'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:07 IST

तुम्हाला हे कादचित विचित्र वाटेल पण, रचेल कौर असं करून बरेच पैसेही वाचवते. सोबतच आपल्या परिवाराला वेळही देते.

रोज सकाळी उठून ऑफिसला जाणं अनेक लोकांना कंटाळवाणं वाटतं. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी लोक बस, रेल्वे, लोकलसाठी धावपळ करतात. ज्यासाठी खूप एनर्जी लागते. कितीही घाई केली तरी उशीर होतोच आणि तणावही वाढतो. ज्याबाबत नेहमीच तक्रार केली जाते. पण अनेकांना हे माहीत नाही की, एक भारतीय महिला रोज आपल्या कामावर जाण्यासाठी फ्लाइटनं जाते. तुम्हाला हे कादचित विचित्र वाटेल पण, रचेल कौर असं करून बरेच पैसेही वाचवते. सोबतच आपल्या परिवाराला वेळही देते.

रोज 700 किलोमीटर प्रवास

रचेल कौर मलेशियामध्ये राहते. ती एअर एशियाच्या फायनान्स ऑपरेशन्समध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. रचेलला 'सुपर-मॉम' असंही म्हटलं जातं. रचेलचा दावा आहे की, ती पाच दिवस दोन राज्यात विमानानं प्रवास करते. CNA इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं की, रोज ती विमानानं प्रवास करूनही किती पैसे वाचवते.

रचेलचं ऑफिस मलेशियाच्या क्वालाल्मंपूर मध्ये आहे आणि घर पेनांगमध्ये आहे. दोन्ही ठिकाणामधील अंतर 350 किलोमीटर आहे. तिनं सांगितलं की, आधी ती ऑफिसजवळच एका भाड्याच्या घरात राहत होती. त्यावेळी आठवड्यातून केवळ एकदाच परिवाराला भेटण्याची संधी मिळत होती. मुलांपासून दूर राहणं तिला जमलं नाही. काम आणि परिवारात बॅलन्स ठेवणं तिला अवघड होत होतं.

रचेलला 11 आणि 12 वर्षाची दोन मुलं आहेत. त्यांच्यापासून तिला फार जास्त काळ दूर राहता आलं नाही. त्यानंतर 2024 मध्ये तिनं निर्णय घेतला. रचेल रोज पेनांग ते क्वालाल्मंपूर प्रवास करणार.

रचेलनं रोजच्या रूटीनबाबत सांगितलं की, 'मी सकाळी 4 वाजता उठते. तयारी करते. 5 वाजता ऑफिससाठी निघते. त्यानंतर पेनांग एअरपोर्टपर्यंत ड्राइव्ह करते. विमानानं 7.45 ला ऑफिसमध्ये पोहोचते. त्यानंतर काम करून रात्री 8 वाजता घरी पोहोचते'.

गुगल मॅप्सनुसार, रचेल रोज साधारण जाण्या-येण्यात 700 किमीचा प्रवास करते. तिनं दावा केला की, आधी ती घराचं भाडं आणि इतर गोष्टींसाठी 41 हजार रूपये खर्च करत होती. आता तिला रोज विमानानं जाण्यासाठी साधारण 27 हजार रूपये खर्च येतो.

रचेलला घरून काम करण्याऐवजी ऑफिसमधून काम करणं आवडतं. तिला असं वाटतं की, सहकाऱ्यांसोबत काम करणं जास्त सोपं असतं. तिला असंही वाटतं की, रोज सकाळी लवकर उठणं थकवणारं असतं. पण सायंकाळी घरी आल्यावर मुलांसोबत वेळ घालवला की, बरं वाटतं.

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके