इंडियन फूड रिव्हू हा प्रकार आजकाल सोशल मिडियावर फार चालतो. अनेक इंन्फ्लूएन्सर्स भारतीय पदार्थ खाऊन त्यांचे त्या पदार्थाबद्दलचं मत सांगतात. काही सकारात्मक असतात, तर काही नकारात्मक असतात. भारतीय पदार्थ आता जवळपास सगळीकडे मिळतात. अमेरीका, लंडन सारख्या ठिकाणी भारतीय पदार्थाला फार मागणी आहे. पण सध्या एक भलतीच चर्चा आहे. एका लंडनच्या उद्योगपतीने सांगितलं की लंडनमध्ये भारतीय पदार्थ भारतापेक्षा जास्त चांगले मिळतात. झालं, त्यावरुन वाद सुरु अहे.
वनप्लस मोबाइल लॉन्च करणारे मोठे उद्योगपती म्हणजे कार्ल पेई. त्यांनी भारतीय अन्नाबद्दल एका वाक्यात केलेली टिपण्णी सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. "भारतीय अन्नपदार्थ भारतापेक्षा लंडनमध्ये जास्त चांगले मिळतात" असे त्यांनी सोशल मीडियात लिहिले होते. ते वाचल्यावर भारतीयांना त्या कमेंटचा फार राग आला तर काहींना त्याचे म्हणणे पटले आहे. सगळेच आपापली मते मांडत आहेत.
भारतात राज्यांमध्येही अन्नावरुन वाद होतो अशात जर देशाच्याच अन्नाबद्दल कोणीतरी टिपण्णी केल्यानंतर भारतीयांना त्याबद्दल वाईट वाटणे तसे सहाजिकच आहे. काही टिपण्ण्यांमुळे भावना दुखावल्या जातात. असेच काही या प्रकरणात पाहायला मिळत आहे. लोकांनी कार्ल पेईला त्याच्या मोबाइल लॉन्चिंग बद्दलही टोमणे मारायला सुरवात केली. मात्र कार्ल पेईच नाही अनेक जण 'लंडनमध्ये सगळ्यात बेस्ट इंडियन फूड मिळते' या वाक्याचा वापर करताना दिसतात. मात्र असे बोलल्यानंतर त्यांनाही प्रचंड ट्रोलिंग सहन करावे लागते. सध्या त्यावरुनच मोठा वाद सुरु आहे.