स्वयंपाक घरात काम करताना सतत काही ना काही दुखापत होतंच असते. पायाच्या करंगळीला ट्रॉलीचं टोक लागतं किंवा पाण्यावरून पाय घसरतो.(If you burn your hand while cooking, do not ignore because..) त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना बारीक-सारीक इजापत होते. घाईगडबडीत काहीतरी तळायला तेलात सोडताना तेल हातावर उडतं. त्याचा चटका फारच भयंकर बसतो. झाकण उघडताना पटकन वाफ हातावर येते. गरम वाफेमुळे हात पोळला जातो. तव्याला बोट लागतं. कुकरची वाफ अंगावर येते. मोहरी जास्तच तडतडली की, अंगावर उडते. गरम तेलाला पाणी लागल्यावर ते अंगावर उडते. (If you burn your hand while cooking, do not ignore because..)या गोष्टी सगळ्यांबरोबरच घडतात. असं काही सतत घडत म्हणून, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टर सांगतात, त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते. डाग कायमस्वरुपी शरीरावर राहू शकतात. त्यामुळे त्वचेचे आजारही होऊ शकतात.
हात पोळला की, तो कितीही फुगू शकतो. जखमेवर पाण्याचे फोड येतात. हात झोंबत राहतो. आपण हात पाण्याखाली धरून सोडून देतो. पण तसे न करता त्यावर योग्य उपचार घ्या. हात बराच वेळ थंड पाण्यात बुडवून ठेवा. बर्फ लावू नका. रक्त गोठू शकते. ओल्या कापडात हात गुंडाळून ठेवा. गार मलम त्यावर लावा. कोरफड लावू शकता. हे सगळं करून आराम मिळत नसेल तर, लागलीच डॉक्टरांकडे जा. रक्त साकळून त्या जागेवर दुखापत वाढू शकते.
हात भाजल्यावर पाण्याचे फोड येतात. ते आपण फोडतो. तज्ज्ञ सांगतात, "ते फोडू नका. तसं केल्याने त्याचे डाग तसेच राहतील." भाजलेल्या भागावर खोबरेल तेल लावा. कोरफड लावा. गार मलम लावा. तूपसुद्धा लावू शकता. त्यावर सतत फुंकर मारा म्हणजे झोंबणार नाही. जर पाण्याचे फोड वाढतच जात असतील तर डॉक्टरांकडे जा.
वाफेवर हात पोळला की ते प्रचंड वेदना देते. त्याचे डाग जाता जात नाहीत. कारण वाफ आपल्याला वाटते त्यापेक्षा कईकपटीने जास्त उष्ण असते. अंगावर वाफ आल्यावर लगेच दुखावलेला अवयव पाण्याखाली धरा. त्याची ऍलर्जी फार लवकर पसरू शकते. हात सुन्न पडू शकतो. लगेच मलम लावा. थंड जेल लावा. पोळल्याचे डाग राहतात. त्यावर लावायला क्रिम मिळते ते वापरा.