Join us

तुझा पगार किती, तू बोलते किती! तरुणीचा ‘लाखांतला’ पगार ऐकून लोक चक्रावले, व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 17:46 IST

i earn 0.1 lakh say's young women, People were shocked to hear the young woman's salary in lakhs, viral video : मी लाखात कमवते सांगणारी मुलगी झाली चांगलीच व्हायरल. पाहा नक्की काय म्हणाली.

एखादी गोष्टी मांडताना ती कोणत्या प्रकारे मांडावी याची समज असणे फार गरजेचे आहे. सगळ्यांनाच ते जमते असे नाही. (i earn 0.1 lakh say's young women,  People were shocked to hear the young woman's salary in lakhs, viral video)काही शब्द वापरुन परिस्थिती कमी बिकट दर्शवता येते. बोलण्याची शैली आणि संकल्पनांचा वापर योग्य करता आला म्हणजे त्या माणसाकडे संवाद कौशल्याची नक्कीच कमतरता नाही. आजकाल जेन-झी मुलेमुली अशा अनेक संकल्पना तसेच शब्द वापरतात, ज्यांचा अंदाजही अनेकांना लावता येत नाही. जसे की आजकाल वडापाव खाल्यावरही दादा किती बक्स झाले असे विचारताना मुले दिसतात. त्या विक्रेत्यालाही त्यांचे शब्द भांबावून सोडतात.  

 

सध्या सोशल मिडियावर रोडसाईड इंटरव्यू हा प्रकार फार चालतो. विविध प्रश्न विचारले जातात आणि मग त्यांची उत्तरे सोशल मिडियावर व्हायरल होतात. त्यावर लोक त्यांची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवतात. अशीच एक मुलाखत देणारी मुलगी सध्या सोशल मिडियावर फार गाजते आहे. तिच्या उत्तरामुळे ती फारच व्हायरल झाली. 

एका इन्फ्लूएन्सरने तरुणीला तिच्या पगाराबद्दल प्रश्न केला. त्यावर तिने अगदी सौम्यपणे सांगितले की मी लाखात कमवते. तिचे हावभाव पाहून ती खरेच बोलत आहे असे वाटते. मात्र नंतर तिने दिलेले उत्तर ऐकून सगळेच चक्रावून गेले. किती लाख कमवतेस असे  विचारल्यावर तिने मी ०.१ लाख कमवते असे उत्तर दिले. अर्थात ती फक्त १० हजार रुपये कमवते हे समजल्यावर तिच्या उत्तराची वाहवाह नेटकऱ्यांनी केली. तिने स्वतःची परिस्थिती स्पष्ट न सांगता अचूक मांडली म्हणून अनेकांनी तिला मॅथ क्विन असे नाव दिले. तर काही जणांनी तिला फार ट्रोलही केले. 

या व्हिडियोने मात्र सगळ्यांना खळखळून हसवले. खोटे न बोलता वेगळ्या पद्धतीने परिस्थिती मांडणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ खरा आहे का मेडअप आहे हे अर्थात अजून कळलेले नाही. मात्र नवी पिढी अशा काही वाक्यांचा वापर करुन इतरांना कायमच पेचात पाडत असते.  हो शब्दाऐवजी बेट, खरंच ऐवजी नो कॅप, मस्तऐवजी लिट आणि सुंदर ऐवजी फायर असे विविध शब्द ही पिढी वापरते. तसेच किती पैसे झालेऐवजी ०.१ लॅक्स, स्टॅक्स, बँण्ड्स,बक्स, बेनजामिन्स असे अनेक शब्द हे वापरतात. त्यांची स्वतःची वेगळी भाषा आहे वेगळी शैली आहे असे म्हणायला हरकत नाही.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियामुलाखतमहिलापैसा