महिला सक्षमीकरणाच्या गप्पा अनेकदा मोठ्या सभा आणि टीव्ही डिबेट्समध्ये ऐकायला मिळतात, पण खरी प्रेरणा ही दैनंदिन आयुष्यातील संघर्षातूनच मिळते. हैदराबादचे पत्रकार सुरेश कोचाटिल यांनी फेसबुकवर एक अशीच गोष्ट शेअर केली आहे, जिने हजारो लोकांची मनं जिंकली आहेत. युनियन बजेटच्या डिबेटसाठी एका टीव्ही स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओकडे जात असताना त्यांची भेट एका महिला 'उबर' ड्रायव्हरशी झाली आणि तिथूनच हा प्रेरणादायी प्रवास समोर आला.
सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 'नॅशनलिस्ट हब' ते '९९ टीव्ही' पर्यंत जाण्यासाठी कॅब बुक केली होती. दोन ड्रायव्हर्सनी आधी ट्रिप स्वीकारली आणि नंतर कॅन्सल केली. तिसऱ्या वेळी जेव्हा कॅब मिळाली, तेव्हा एपवर एका महिलेचं नाव पाहून ते चकित झाले. जेव्हा गाडी आली, तेव्हा ड्रायव्हर एक महिला होती, ज्यांचं नाव नंदिनी होतं. संवादादरम्यान त्यांना समजलं की, नंदिनी गेल्या एक वर्षापासून उबर चालवत आहेत.
नंदिनी यांचा जीवनप्रवास
नंदिनी या मूळच्या विजयवाडा येथील असून तीन मुलांच्या 'सिंगल मदर' आहेत. मुलांचं शिक्षण आणि चांगल्या उत्पन्नासाठी त्या हैदराबादला आल्या. आता त्या दिवसरात्र गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुरेश यांनी लिहिलं की, जेव्हा मीडियामध्ये महिला सक्षमीकरणावर चर्चा होते, तेव्हा नंदिनींसारख्या स्त्रिया कोणताही गाजावाजा न करता खरी लढाई लढत असतात.
सोशल मीडियाची प्रतिक्रिया
ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी नंदिनींचे भरभरून कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं की, "सिंगल मदर असणं कठीण आहे, पण नंदिनी धैर्याने जगाचा सामना करत आहेत." तर कुणीतरी म्हटलं की, इतक्या हिमतीने हे काम करणं खरोखरच कौतुकास्पद आहे. अनेकांनी नमूद केलं की, महिला सक्षमीकरण हा केवळ एक पोकळ शब्द नसून नंदिनींसारख्या महिलांच्या जगण्याचा तो भाग आहे.
या पोस्टनंतर अनेकांनी आपले अनुभव शेअर केले. कोणी फ्लिपकार्टमध्ये महिला डिलिव्हरी पार्टनर पाहिल्याचं सांगितलं, तर कोणी ई-रिक्षा चालवणाऱ्या महिलांचं उदाहरण दिलं. दिल्ली आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये महिला ऑटो आणि ई-रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. नंदिनी यांच्या गोष्टीने हे सिद्ध केलं आहे की, सक्षमीकरण हे केवळ शब्दांनी नाही, तर कष्ट आणि हिमतीने साध्य होतं.
Web Summary : Nandini, a single mother from Vijayawada, drives a cab in Hyderabad to support her three children after her husband's death. Her resilience inspires many, highlighting true women's empowerment through hard work and courage.
Web Summary : विजयवाड़ा की नंदिनी पति के निधन के बाद हैदराबाद में कैब चलाकर अपने तीन बच्चों का भरण-पोषण करती हैं। उनकी दृढ़ता कई लोगों को प्रेरित करती है, जो कड़ी मेहनत और साहस के माध्यम से वास्तविक महिला सशक्तिकरण को उजागर करती है।