Join us

तिच्यासाठी कायपण! आजारी पत्नीचे केस विंचरणाऱ्या आजोबांचं प्रेम पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:50 IST

Husband is Taking Care of Sick Wife : इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जो कोणी पाहतोय ते  'नवरा-बायकोची जोडी अशीच असावी'. अशी रिएक्शन देत आहेत.

तुम्ही पत्नीला  पतीची सेवा करताना अनेकदा पाहिलं असेल, पण तुम्ही कधी पतीला पत्नीची सेवा करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये महिला आपल्या पतीची सेवा करताना दिसतात, परंतु सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पुरुष आपल्या आजारी पत्नीची सेवा करताना दिसत आहे आणि ती मोठ्या प्रेमाने तिचे केस विंचरताना दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जो कोणी पाहतोय ते  'नवरा-बायकोची जोडी अशीच असावी'. अशी रिएक्शन देत आहेत. (Viral video of husband wife where husband is taking care of sick wife)

पती पत्नीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर RVCJ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक अत्यंत आजारी महिला बेडवर बसलेली दिसत आहे. तिला आपले कामही हाताने करता येत नाही. अशा स्थितीत तिचा नवरा तिचे केस बांधताना दिसत आहे.  लग्नाच्या नात्याला सात जन्मांचे नाते असे म्हणतात आणि असा जोडीदार सात जन्मासाठी मिळाला तर आयुष्य सुखी होते.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला या 'नवरा बायकोच्या' प्रेमाने भरलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. वास्तविक जीवन असो किंवा सोशल मीडिया, आपण अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण होताना पाहतो, परंतु अशा प्रकारचा क्यूट व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतो.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या पती पत्नीचा हा मनमोहक व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे आणि आतापर्यंत हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. एका यूजरने कमेंट बॉक्सवर लिहिले की, 'मलाही असं प्रेम हवे आहे'. दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'यालाच खरे प्रेम म्हणतात'. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, 'नवीन पिढी नाही, त्यामुळे दोघांमध्ये इतकं प्रेम आहे.'

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल