lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > वॉशिंग मशीनमध्ये बूट धुता? ३ गोष्टी अजिबात विसरु नका, महागडे बूट फेकायची येते वेळ

वॉशिंग मशीनमध्ये बूट धुता? ३ गोष्टी अजिबात विसरु नका, महागडे बूट फेकायची येते वेळ

How to Wash Shoes in the Washing Machine : शूज धुताना वॉशिंग मशीन घाण होऊ नये म्हणून फॉलो करा ३ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 03:31 PM2024-02-21T15:31:55+5:302024-02-21T15:33:13+5:30

How to Wash Shoes in the Washing Machine : शूज धुताना वॉशिंग मशीन घाण होऊ नये म्हणून फॉलो करा ३ टिप्स

How to Wash Shoes in the Washing Machine | वॉशिंग मशीनमध्ये बूट धुता? ३ गोष्टी अजिबात विसरु नका, महागडे बूट फेकायची येते वेळ

वॉशिंग मशीनमध्ये बूट धुता? ३ गोष्टी अजिबात विसरु नका, महागडे बूट फेकायची येते वेळ

पर्सनॅलिटी सुंदर दिसावी यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. शिवाय स्वतःकडे अधिक लक्ष देतो. बऱ्याचदा कपडे, मेकअप आपला परफेक्ट होतो. पण घाणेरड्या शूजमुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो. आपण पोशाखानुसार चप्पल, सँडल किंवा शूज कॅरी करतो. पण अनेकदा अधिक वापरामुळे शूज खराब होतात (Washing Machine). त्यावर डाग पडतात. शूज साफ करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

शिवाय अधिक वेळही वाया जातो. जर आपल्याला वेळेची बचत आणि मेहनत न घेता शूज साफ करायचे असेल तर, वॉशिंग मशीनमध्ये शूज साफ करा (Cleaning Tips). या ट्रिकमुळे काही मिनिटात शूज साफ होईल, शिवाय अधिक मेहनतही घ्यावी लागणार नाही(How to Wash Shoes in the Washing Machine).

एकटीने प्रवास करणाऱ्या तरुणीचे बळकावले सीट, ट्विट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची मदत

वॉशिंग मशीनमध्ये शूज साफ करण्याची नवी ट्रिक

- वॉशिंग मशीनमध्ये शूज साफ करताना त्यात एक जुना टॉवेल घाला. वॉशिंग मशीनमध्ये शूजसोबत टॉवेल घातल्याने शूज एकमेकांवर कमी घासले जातील. यासह लेसेस आपापसात अडकण्याची समस्याही कमी होईल. टॉवेल शूजच्या आतील घाण स्वच्छ करते. ज्यामुळे कमी वेळात शूज स्वच्छ होतील.

- वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताना मिडियम रींस सायकलमध्ये सेटिंग ठेवा. हेवी रींस सायकलमध्ये शूज खराब होण्याची शक्यता वाढते. शिवाय शूज धुताना गरम पाण्याचा वापर टाळा. थंड पाण्याने शूज धुतल्याने शूज परफेक्ट क्लिन होतील.

पडत्या काळात विक्रांतला सावरलं, फिल्म ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे, शीतलने केली मदत..

-  शूज धुताना वॉशिंग मशीन खराब होऊ नये यासाठी लॉन्ड्री बॅगचा वापर करा. लॉन्ड्री बॅगच्या वापरामुळे वॉशिंग मशीनमध्ये घाण जमा होणार नाही. शिवाय शूज योग्य पद्धतीने स्वच्छ होतील.

Web Title: How to Wash Shoes in the Washing Machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.