Join us

हिवाळ्यात थंड पाण्यात हात न घालता भांडी कशी घासाल? ३ टिप्स- भांडी होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 15:26 IST

How To Wash Dishes By Hand The Right Way in Winter : झटपट भांडी घासण्याची पाहा सोपी युक्ती.

हिवाळ्यात थंडी (Winter) वाजली, की पाण्यापासून आपण ४ हात दूर राहतो. कोमट पाणीही क्षणात थंड होते. पण तरीही पाण्याचा वापर होतोच. आंघोळीनंतर, इतर कामांसाठी म्हणजेच, भांडी (Utensils) किंवा कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर होतो. दिवसभरात ३ वेळा आपण भांडी घासतो. भांडी धुताना पाण्यात हात घालावा लागतो (Cleaning Tips). थंड पाण्यात हात घालताच, हात सुन्न पडतात.

अनेकदा हात थरथरूही लागतात. भांडी घासताना याचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर, ३ प्रकारच्या हॅक्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे काम करणं सोपं होईल. शिवाय मिनिटभरात भांडी साफ होतील(How To Wash Dishes By Hand The Right Way in Winter).

हातमोजे वापरा

भांडी धुताना जर फार थंडी वाजत असेल तर, हातमोजे वापरा. हातमोजे घातल्याने आपले हात थंड पडत नाही. त्यामुळे भांडी घासताना चांगल्या दर्जाची हातमोजे वापरा. पाणी कितीही थंड असलं तरीही हात थंड पडणार नाही.

थंडीत गुडघे-कंबरेचं दुखणं वाढलंय? 'या' घरगुती तेलानं मालिश करा, ठणठणीत राहतील हाडं

कोमट पाणी वापरा

भांडी धुताना जर जास्त थंड पाणी असेल तर, कोमट पाण्याचा वापर करा. यासाठी सर्वात आधी एक टब कोमट पाणी घ्या. नंतर त्यात मीठ किंवा बेकिंग सोडा घाला. नंतर त्यात खरकटी भांडी घालून भिजत ठेवा. यामुळे भांड्यातील घाण निघून जाईल. नंतर घसणीने घासून आपण भांडी स्वच्छ धुवून घेऊ शकता.

भांडी अधिक वेळ ठेवू नका

किचन सिंकमध्ये शक्यतो भांडी साठवून ठेवू नये. यामुळे घरात झुरळं आणि मुंग्या होतात. यासह भांडी घासण्याचा तापही वाढतो. त्यामुळे भांडी साठवून ठेवू नका. कमी भांडी असतानाच घासून स्वच्छ धुवून घ्यावी. यामुळे जास्त वेळ थंड पाण्यात आपले हात राहणार नाहीत. शिवाय कमी वेळात भांडी स्वच्छ धुवून होतील.

ना तांदूळ - ना रवा, तरीही इडल्या होतील स्पॉन्जी - कापसासारख्या हलक्या; १५ मिनिटांत इडली तयार

भांडी झटपट घासण्यासाठी टिप्स

भांडी झटपट घासण्यासाठी आपण १ ट्रिक वापरू शकता. आधी बेसिन लॉक करा. जेणेकरून पाणी पाईपद्वारे जाणार नाही. नंतर त्यात पाणी भरा. २ कप व्हिनेगर आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड घाला, लिंबाचे तुकडेही घाला. १५ मिनिटांसाठी तसेच भांडी पाण्यात भिजत ठेवा. नंतर ब्रश आणि पाण्याने भांडी धुवून घ्या. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया