Join us

लिंबाच्या साली निरुपयोगी समजून फेकून देता का? आताच थांबा, 'असा' करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:56 IST

लिंबाच्या रसाप्रमाणेच त्याची साल देखील खूप उपयुक्त ठरू शकते. लिंबाच्या सालीचा नेमका कसा वापर करायचा हे जाणून घेऊया...

लिंबू आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांना माहित आहे. त्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी विशेषतः तुमचे केस, त्वचा आणि पोटासाठी फायदेशीर आहे. पण लिंबाचा रस पिळल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो, कारण आपण ते निरुपयोगी समजतो. पण तुमचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण त्याच्या रसाप्रमाणेच त्याची साल देखील खूप उपयुक्त ठरू शकते. लिंबाच्या सालीचा नेमका कसा वापर करायचा हे जाणून घेऊया...

लिंबाच्या सालीचा असा करा पुन्हा वापर 

फरशी करा स्वच्छ

- लिंबाची साल पाण्यात उकळवा आणि हे पाणी फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरा. यामुळे घरात फिरणाऱ्या माश्यांपासून सुटका होऊ शकते.

- लिंबाच्या पाण्यात व्हिनेगर मिसळून देखील फरशी स्वच्छ करू शकता, यामुळे तुमची फरशी चांगली स्वच्छ होईल आणि अगदी नव्यासारखी होईल.

- लिंबाच्या सालीच्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून फरशी  स्वच्छ करू शकता, यामुळे घरातील कीटक दूर होण्यास मदत होऊ शकते.

-  लिंबाच्या सालीने स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता. यामुळे स्वयंपाकघरातील चिकटपणा निघून जाईल आणि तुमच्या स्वयंपाकघरात झुरळ येणार नाहीत.

स्क्रब बनवा

जर तुमची त्वचा उन्हामुळे जळजळत असेल तर लिंबाच्या साली वाळवा, त्याची पावडर बनवा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्यात १ चमचा दही आणि १ चमचा बेसन मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. आता हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर १५ मिनिटं ठेवा आणि नंतर ते धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि ताजी दिसेल.

टॅग्स :किचन टिप्स