Lifestyle Hack : सोशल मीडियावर रोज कितीतरी रील्स व्हायरल होत असतात. यातील काही रील्स केवळ टाइमपाससाठी असतात तर काही रील्स रोजच्या कामात पडणाऱ्या गोष्टींची माहिती देणारे असतात. या रील्समध्ये लाइफस्टाईलशी संबंधित वेगवेगळ्या टिप्स दिलेल्या असतात. कधी घरातील स्वच्छतेसंबंधी तर कधी गार्डनसंबंधी रील्समधील माहिती महत्वाची ठरते. असंच एक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्यात तरूणी किंवा महिलांसाठी एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
सामान्यपणे अनेक महिला किंवा तरूणी रोज रबर बॅंडचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी वापर करतात. पण अनेक रबर सैल झाल्यानं ते फेकले जातात. पण आता तुम्हाला सैल झालेले रबर बॅंड फेकण्याची गरज पडणार नाही आणि नवीन आणण्याचीही गरज पडणार नाही. कारण या व्हिडिओत एक खास ट्रिक सांगण्यात आली आहे.
व्हायरल झालेल्या रीलमध्ये तुम्ही बघू शकता की, एक तरूणी एका भांड्यात पाणी टाकून गॅसवर ठेवत आहे. त्यानंतर ती सैल झालेले रबर बॅंड त्या पाण्यात टाकते. काही वेळात गरम पाण्यात टाकलेले रबर बॅंड आकुंचन पावून आपल्या जुन्या शेपमध्ये येतात. त्यानंतर तरूणी एक एक करून सैल झालेले सगळे रबर बॅंड पाण्यात टाकते आणि लगेच ते सगळे टाइट होतात. ते एकदम आधीसारखे नवीन दिसतात.
हे रील इन्स्टाग्रामवर @groomygunjan4u नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 2 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच जास्तीत जास्त महिला व्हिडिओवर कमेंट्स करून या माहितीसाठी धन्यवादही देत आहेत. एका महिलेनं यावर मजेदारपणे कमेंट केली आहे की, यासाठी नोबेल पुरस्कार द्यायला हवा. अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोक करत आहेत.