Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी जेवण झाल्यानंतर झोपण्याची योग्य पद्धत पाहा- हृदयावर ताण येणार नाही, पचनही चांगले होईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 14:41 IST

Power Nap: दुपारी जेवण झाल्यानंतर खूप लोकांना सुस्ती येते. मग अशावेळी नेमकं काय करावं पाहा...

सकाळी उठल्यापासून ते दुपारचं जेवण होईपर्यंत प्रत्येक जण एका स्पीडने काम करत असतो. उठल्यानंतर काय काय कामं करायची याची एक अदृश्य यादीच आपल्या डोळ्यांसमोर फिरत असते आणि आपण ती कामं संपविण्याचा प्रयत्न करत असतो. मग ही सगळी धावपळ झाल्यानंतर दुपारचं जेवण होतं आणि कामाचा वेग एकदम कमी होतो. जेवण झाल्यानंतर ती काही वेळा एवढी सुस्ती येते की झोपावं वाटतं. घरी असणाऱ्या बहुतांश स्त्रिया, वृद्ध व्यक्ती दुपारच्या जेवणानंतर थोडीशी वामकुक्षी घेतातच. पण जर झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत जातो. म्हणूनच दुपारी जेवल्यानंतर झोपावं वाटलं तर अवश्य झोपा. पण झोपताना आपल्या शरीराची अवस्था कशी असायला हवी हे एकदा बघाच...

 

दुपारी जेवण झाल्यानंतर कशा पद्धतीने झोपावं?

याविषयीचा एक चांगला व्हिडिओ योगा आणि फिटनेस अभ्यासक विजय आनंद यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ते सांगतात की ज्यांना दुपारी जेवल्यानंतर झोपायचं असेल त्यांनी आपल्या आजी- आजोबांची वामकुक्षीची पद्धत एकदा पाहायला हवी.

तळपायांची आग होते- डोळे जळजळतात? शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी ३ सोपे उपाय

बऱ्याच घरांमध्ये घरातल्या वृद्ध माणसांसाठी आराम खुर्ची असते. यावर बसूनच ज्येष्ठ मंडळी वामकुक्षी घेतात. ही पद्धत सगळ्यात योग्य आहे. कारण यामध्ये आपले हृदय पोटाच्या वर असते. त्यामुळे ना हृदयावर ताण येतो ना अपचनाच्या कामात अडथळा येतो. त्यामुळे खुर्चीवर किंवा बेडवर टेकून बसा अणि डोकं भिंतीला लावून झोप घ्या. 

 

किंवा अशा पद्धतीने झोपणं तुम्हाला आरामदायी वाटत नसेल तर बेडवर झोपा. पण झोपताना डाव्या अंगावर झोपा. उजव्या अंगावर झोपल्यास आतड्यांची अवस्था बदलते आणि त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे डाव्या अंगावर झोपणे हा नियम कटाक्षाने पाळा.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

वामकुक्षी १५ ते २० मिनिटे किंवा फार तर अर्ध्या तासाची असावी. त्यापेक्षा जास्त झोपणे टाळायला हवे. छोटीशी वामकुक्षी घेतली तर तुम्ही अधिक फ्रेश होता. एनर्जेटिक वाटते. काही जण तर असंही सांगतात की दुपारी १० ते १५ मिनिटे घेतलेली पॉवर नॅप म्हणजे ब्यूटी स्लीप आहे. यामुळे तुमची त्वचा आणि आरोग्य दोन्हीही उत्तम राहण्यास मदत होते. शरीरातले हार्मोन्स व्यवस्थित राहतात. त्यामुळे झोपावं वाटलं तर झोपा पण हे नियम पाळा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Best way to nap after lunch for good digestion, heart health.

Web Summary : Taking a nap after lunch is common, but posture matters. Yogic expert Vijay Anand suggests sitting upright in a chair or lying on your left side for optimal digestion and heart health. Limit naps to 15-20 minutes for freshness and hormonal balance.
टॅग्स :सोशल व्हायरलआरोग्यअन्न