उन्हाळा सुरू झाला की महिलांच्या मागे भरपूर उन्हाळी कामं असतात. वर्षभर पुरेल एवढं वाळवण करून ठेवणे, तिखट, मसाले करून ठेवणे तसेच वर्षभराचं धान्य भरून ठेवणे. त्याआधी ते धान्य घरात आणल्यानंतर ते व्यवस्थित निवडून घेणे, धान्याला ऊन देणे आणि पुन्हा ते व्यवस्थित कोठीमध्ये भरून ठेवणे.. एवढी सगळी कामं अनेक घरांमध्ये चालू होती, पण तेवढ्यातच वातावरण बदलले आणि पावसाने दमदार हजेरी लावली. सुरुवातीला नुसतं आभाळ आणि भुरभुर असणाऱ्या पावसाने हळूहळू रुप बदलून टाकलं आणि अगदी पावसाळ्याच्या मध्यावर असतो तसा धो धो पाऊस सगळीकडे बरसू लागला (how to store grains for years?). यामुळे मात्र कित्येक उन्हाळी कामं आता अपुरी राहिली असून बऱ्याच महिलांना धान्य साठवून ठेवण्याचं टेन्शन आलं आहे.(3 tips for the storage of wheat and rice for long)
वर्षभरासाठी धान्य कसं साठवून ठेवावं?
पुढे सांगितलेले काही उपाय करून तुम्ही वर्षभर अगदी उत्तम पद्धतीने धान्य साठवून ठेवू शकता. धान्य भरताना आणि नंतर त्याचा वापर करताना काही काळजी घेतली तर अगदी वर्षभर तुमच्या धान्यामध्ये एकही किडा किंवा अळी दिसणार नाही.
काठपदराची साडी नेसल्यावर खूपच काकुबाई दिसता? ७ लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स- स्टायलिश, सुंदर दिसाल
१. धान्य भरून ठेवण्यापुर्वी त्याला खरंतर ऊन देणं गरजेचं असतं. पण सध्या पावसाळी हवेमुळे ते शक्य नाही. त्यामुळे ज्या कोठीमध्ये धान्य भरून ठेवणार आहात ती पुर्णपणे कोरडी आहे ना, तिच्यात कुठेही ओल नाही ना याची खात्री करा आणि मगच धान्य भरा.
२. तांदूळ भरत असताना काेठीच्या सगळ्यात खाली आणि सगळ्यात वरती कडुलिंबाच्या पानांचा जाडसर थर घालायला विसरू नका. तसेच तांदळामध्ये ठिकठिकाणी तेजपान टाकून ठेवा. तेजपान किंवा तमालपत्र टाकून ठेवल्याने तांदळात अळ्या, किडे होणार नाहीत.
डायबिटीस होण्याआधीच महिलांच्या शरीरात दिसू लागतात २ लक्षणं! धोक्याची घंटा वेळीच ओळखा
३. डाळी भरून ठेवताना डाळीच्या डब्यामध्ये काडेपेटी किंवा हळकुंड घालून ठेवा. काडेपेटीला असणाऱ्या उग्र वासामुळे किडे, अळ्या होत नाहीत.
४. धान्याच्या कोठ्या नेहमी स्वच्छ सुर्यप्रकाश येणाऱ्या परंतू काेरड्या असणाऱ्या ठिकाणीच साठवून ठेवावं.