हल्ली बहुतांश घरात आपण बघतो की घराच्या आजुबाजुला फुलझाडं लावायला जागा नसते. बाल्कनीमध्ये कुंड्या ठेवून काही जणं हौशीने जास्वंद, सदाफुली, गुलाब अशी रोपं लावतात. पण त्यांची फुलं अनेकांना रोजच्या पुजेसाठी पुरत नाहीत. त्यामुळे मग बाजारात गेल्यावर अगदी ८ दिवस पुरतील एवढी फुलं ते एकदमच घेऊन येतात. पण यात अशी अडचण येते की सुरुवातीला २ ते ३ दिवस फुलं चांगली राहतात. पण त्यानंतर मात्र ती सडायला लागतात आणि खराब होतात. असं होऊ नये यासाठी फुलं जास्तीतजास्त दिवस फ्रेश ठेवण्याची ही एक सोपी पद्धत पाहून घ्या (simple tricks to keep flowers fresh). आता सणावाराचे दिवस सुरू झालेले आहेतच (how to store flowers for long?). त्यामुळे हा उपाय नक्कीच घरोघरी कधी ना कधी उपयोगी येऊ शकतो.(how to keep flowers fresh for long?)
फुलं जास्तीतजास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काय उपाय करावा?
जेव्हा तुम्ही बाजारातून फुलं विकत आणाल तेव्हा ती सगळ्यात आधी एका पेपरवर पसरवून ठेवा. त्यानंतर त्या फुलांमधून थोडे सडके असणारे, खराब असणारे फूल लगेच वेगळे काढा. कारण एक जरी खराब फूल असेल तर त्यामुळे इतर चांगली फुलंही लगेच खराब होतात.
वजन आयुष्यभर राहील कंट्रोलमध्ये! फक्त २ गोष्टी नियमित करा- वजन वाढण्याची चिंता विसरा
यानंतर त्या फुलांमधून खूप जास्त ओलसर असणारी फुलंही वेगळी काढा. फुलांवर जर गरजेपेक्षा जास्त पाणी शिंपडलेलं असेल तर त्यामुळे फुलं लवकर खराब होऊ शकतात. अशी ओलसर फुलं थोडी सुकू द्या आणि नंतर ती वेगळी भरून ठेवा.
आता एक एअरटाईट कंटेनर घ्या. त्यामध्ये एक सुती कपडा घाला. आता त्यावर फुलं ठेवा. फुलं खूप कोंबून किंवा दाबून ठेवू नये. अगदी अलगद बसतील एवढीच फुलं ठेवा.
बटाट्याचे पराठे नेहमीचेच, आता बटाट्याचं धिरडं करून खा! मुलांचा डबा आणि नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी
त्यानंतर त्यावर तांदूळ घाला. तांदुळामुळे फुलांमधला ओलावा शोषून घेतला जातो आणि ते खराब होत नाहीत. आता तो सुती कपडा फुलांच्यावरून गुंडाळा आणि डब्याचं झाकण लावून तो फ्रिजमध्ये ठेवून द्या. फुलं ८ दिवस अगदी छान टिकतील.