लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं. शाळा, कॉलेज, ऑफीस अशा काही ना काही कारणांनी आपण दिवस दिवस घराच्या बाहेर असतो. तेव्हा दिवसभर आपल्याला चांगेल खायला मिळावे यासाठी आई एक नाही तर २ ते ३ डबे सोबत देते. प्रवासात अचानक भूक लागली तर पटकन काहीतरी जवळ असावं म्हणून आवर्जून छोटे डबे भरले जातात. दिवसभर ताकद टिकून राहावी यासाठी पोटात पौष्टीक पदार्थ जाणं गरजेचं असतं. यामध्ये फळं, पोळी-भाजी, राजगिऱ्याचे लाडू किंवा दाण्याची चिक्की अशा काही ना काही गोष्टींचा समावेश असतो. फळांमध्येही डब्यात नेता येईल असे फळ म्हणजे सफरचंद. बाकी फळं एकतर मऊ पडतात किंवा त्यांचा चिकदा होतो, म्हणून डब्यात आवर्जून सफरचंद दिले जाते (How To Save Sliced apple From Browning Easy Hack).
सफरचंद आख्खे नेण्यापेक्षा आपण त्याच्या फोडी करुन नेणे पसंत करतो. पण या फोडी आपण लगेच खाल्ल्या नाहीतर तर त्या हळूहळू काळ्या पडायला लागतात. मग सफरचंदाचा कडकपणाही कमी होतो आणि आपल्याला डब्यातील हे सफरचंद खाण्याचीच इच्छा राहत नाही. मात्र असे होऊ नये आणि हे सफरचंद फ्रेश चिरल्यासारखे वाटावे, पांढरे शुभ्र दिसावे यासाठी काय करता येईल असा प्रश्न आपल्याला पडतो. सगळ्यांसमोर सफरचंद दाताने तोडून खाणे तर शक्य नसते आणि ते चिरण्यासाठी आपल्याकडे सुरी असेतच असे नाही. म्हणूनच आपण या फोडी करुन आणणे पसंत करतो. पण या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून आज आपण १ सोपी ट्रीक पाहणार आहोत.
काय आहे उपाय ?
१. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे.
२. आता सफरचंदाचे तुकडे करुन ते या मिठाच्या पाण्यात १० मिनीटांसाठी ठेवावेत.
३. त्यानंतर हे तुकडे एका डब्यात भरुन हा डबा सोबत न्यावा.
४. सफरचंदासोबत मीठाची आणि पाण्याची प्रक्रिया झाल्याने कदाचित या फोडी काळपट पडत नसतील आणि आहे तशा छान राहत असतील.