गॅस सिलेंडर लवकर संपलं तर बजेट डगमगतं. कुकींग गॅस सिलेंडर महिना पूर्ण होण्याच्या आतच संपत अशा स्थितीत काही छोट्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. स्वंयपाक करताना थोडी सावधगिरी बाळगली (Cooking Gas Saving Tips) तर गॅस जास्त दिवस चालेल आणि स्वयंपाक करण्याचा वेळही व्यवस्थित कमी होईल. खाली दिलेल्या ८ टिप्स तुम्ही रोजचा स्वंयपाक करताना फॉलो केल्या तर स्वंयपाक लवकर होण्यास मदत होईल. (How To Save LPG Gas)
1) योग्य झाकणाचा वापर
जेव्हाही तुम्ही स्वंयपाक कराल तेव्हा झाकण लावायला विसरू नका. यामुळे वाफ, गरम भांड्याच्या आत तयार राहील आणि स्वयंपाक लवकर होईल. डाळ, भाजी किंवा भात झाकण लावूनच शिजवा. ज्यामुळे गॅस वाचेल. याशिवाय डाळी शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवा ज्यामुळे त्या लवकर शिजतील (Ref). ठराविक वेळेनंतर गॅसचे बर्नर स्वच्छ करा.
१० सेकंदात निघेल कानात साचलेला मळ; डॉक्टर सांगतात 3 उपाय, मळ निघेल-ऐकूही नीट येईल
2) योग्य आकाराची भांडी निवडा
कमी अन्न असेल आणि तुम्ही ते मोठ्या भांड्यात शिजवत असाल तर पदार्थ तयार होण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून छोट्या भांड्यांचा वापर करा. ज्यामुळे गॅसची बचत होईल.
3) प्रेशर कुकरचा वापर
प्रेशर कुकर गॅस वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. डाळी, भाज्या, सूप बनवण्यासाठी तुम्ही कुकरचा वापर करू शकता. फक्त पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा आणि झाकण व्यवस्थित लावा.
4) लिकेजवर लक्ष द्या
जर गॅस लिक होत असेल, आच मंद असेल तर गॅस लवकर संपू शकतो. वेळोवेळी गॅस पाईप, रेग्युलेटरची तपासणी करा. गरज पडल्यास टेक्निशियन्सना दाखवा.
७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत
5) साहित्य आधीच तयार ठेवा
भाजी चिरणं, मसाले काढून ठेवणं, इतर तयारी गॅस सुरू करण्याआधीच करा. यामुळे गॅसची बचत होईल आणि कमी वेळ गॅस सुरू ठेवावा लागेल.
6) भांडी आणि फ्लेम यांच्यातील अंतर
भांडी जास्त उंचावर ठेवली तर आच व्यवस्थित लागत नाही आणि गॅस जास्त वाया जातो. म्हणून भांडं आणि फ्लेम यांच्यातील अंतरावर लक्ष ठेवा.
7) कमी प्रमाणात शिजवा
एकदाच जास्त अन्न शिजवण्यापेक्षा कमी प्रमाणात अन्न थोडा-थोडा वेळ शिजवल्यास गॅसची बचत होते.
8) मंद आचेवर शिजवा
उच्च आचेपेक्षा मंद आचेवर स्वंयपाक करा. झाकण ठेवून कमी आचेवर शिजवल्यास गॅस कमी लागतो आणि स्वयंपाकही लवकर होतो.