टॉयलेट, बाथरूम साफ असणं खूपच गरजेचं असतं. घरातील बाथरूम जर अस्वच्छ असेल तर कोणालाही बाथरूम वापरताना किळस वाटते किंवा घरभर त्याचा दुर्गंध परसतो. अस्वच्छतेमुळे आजारही पसरू शकता. टॉयलेट सीटवर लागलेल पिवळे डाग अनेकदा प्रयत्न करूनही निघत नाहीत. काही सोपे, स्वस्त उपाय करून तुम्ही बाथरूम सीटवर लागलेले डाग लगेच काढून टाकू शकता. (How To Clean Toilet Commode)
काहीजण आठवड्यातून एकदा किंवा २ ते ३ दिवसांतून टॉयलेट स्वच्छ करतात. पण असं न करता रोजच्या रोज टॉयलेट स्वच्छ करायला हवं. कारण अस्वच्छ टॉयलेट बॅक्टेरियाजचं घर बनतं. घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही पटकन टॉयलेट स्वच्छ करू शकता. (How To Remove Yellow Stains From Toilet Seat Naturally Cleaning Tips)
1) केळीचे साल आणि तुरटी
जर घरातील बाथरूमच्या टॉयलेट सीटवर लागलेले पिवळे डाग घासूनही जात नसतील तर तुम्ही केळ्याचे साल आणि तुरटी मिसळून मिसळून या मिश्रणानं टॉयलेट सीट स्वच्छ करू शकता. यासाठी हे द्रावण गरम पाण्यात घालून व्यवस्थित साफ करून घ्या.
2) व्हाईट व्हिनेगर
व्हिनेगरच्या वापरानं टॉयलेट सीटवरून पांढरे डाग निघून जाण्यास मदत होते. टॉयलेट सीटच्या चारही बाजूंनी व्हिनेगर शिंपडा नंतर १५ ते २० मिनिटं तसंच राहू द्या. मग पाणी घालून टॉयलेट स्वच्छ करा.
3) लिंबाचा रस आणि मीठ
लिंबाचा रस आणि मीठ डाग स्वच्छ करण्यासाठी एक परिणामकारक उपाय आहे. टॉयलेट सीट चमकवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. हे एका नॅच्युरल ब्लीचप्रमाणे काम करते. डाग कमी होतात.
4) बेकींग सोडा
टॉयलेट सीटचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. हे डाग काढण्यासाठी बेकींग सोडा सॅनिटाईजरप्रमाणे काम करतो. बेकींग सोड्याचा वापर केल्यास तुम्हाला कमी मेहनतील स्वच्छ टॉयलेट दिसून येईल.
5) टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलचा वापर करून घाण साफ करणं खूपच सोपं आहे. ज्यामुळे डाग निघण्यास मदत होते. टॉयलेट सीटची साफसफाई करताना नेहमीच ग्लोज घालून मगच स्वच्छ करा. अन्यथा तुम्हाला आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Web Summary : Remove tough toilet stains with simple home ingredients like banana peel, vinegar, lemon, baking soda, and tea tree oil. Regular cleaning prevents bacteria and keeps your bathroom fresh and hygienic.
Web Summary : केले के छिलके, सिरका, नींबू, बेकिंग सोडा और टी ट्री ऑयल जैसे घरेलू सामग्री से टॉयलेट के जिद्दी दाग हटाएं। नियमित सफाई बैक्टीरिया को रोकती है और आपके बाथरूम को ताजा और स्वच्छ रखती है।