Join us

कॉलरचे काळपट डाग निघतच नाही? ब्रशनं रगडण्यापेक्षा ३ उपाय करा, एका मिनिटांत कॉलर स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 20:11 IST

how to remove stains from collar : काळपट, हट्टी डाग काढून टाकण्यासाठी हे खास सोल्यूशन....

रोजच्या कामांमध्ये कपडे धुण्याचं काम हे खूपच कंटाळवाणं आणि किचकट वाटतं. त्यात लाईट शेडच्या कपड्यांवर मळाचे काळपट डाग लागले असतील तर ते धुणं खूपच त्रासदायक ठरतं (Cleaning Hacks). शर्टाच्या कॉलरला लागलेले काळपट डाग काढण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. हे उपाय केल्यास जास्त न रगडता न घासता तुम्हाला चांगला रिजल्ट मिळेल. (How to remove collar stains from white shirt)

लिंबू आणि मीठाचा उपाय

हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. एका भांड्यात लिंबाचा रस घ्या आणि त्यात थोडे मीठ मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट कॉलरच्या डागांवर हलक्या हाताने घासून लावा. पाच ते दहा मिनिटे तशीच राहू द्या आणि नंतर नेहमीप्रमाणे शर्ट धुवा. लिंबातील ॲसिड आणि मीठातील खडबडीतपणा डागांना मुळापासून काढून टाकतो.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचे मिश्रण एक उत्तम क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. एका छोट्या वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावा. थोड्या वेळाने तुम्ही बघाल की फेस तयार होत आहे. सुमारे १५ मिनिटे ही पेस्ट डागांवर तशीच राहू द्या. त्यानंतर, एका जुन्या टूथब्रशने हळूवारपणे डाग घासून काढा आणि नेहमीप्रमाणे धुवा.

डिश वॉशिंग लिक्विड

डिश वॉशिंग लिक्विड फक्त भांड्यांसाठी नाही, तर कपड्यांवरील तेलकट डागांसाठीही उपयोगी ठरते. १ ते २ थेंब डिश वॉशिंग लिक्विड थेट डागावर लावा आणि बोटाने किंवा ब्रशने घासून घ्या. ५-१० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे डागांचा तेलकटपणा आणि घाण निघून जाईल. त्यानंतर, शर्ट नेहमीप्रमाणे धुवा.

कॉलरवर डाग लागताच तो काढण्याचा प्रयत्न करा. जुने डाग काढणे अधिक कठीण असते. शक्य असल्यास, डाग लागल्यावर लगेच साबण किंवा लिक्विड डिटर्जंटने डाग लागलेला भाग धुवा. यामुळे डाग कपड्याच्या तंतूंमध्ये खोलवर शिरत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शर्ट वापरल्यानंतर तो नियमितपणे धुवा. प्रत्येक वेळी धुताना कॉलरवर थोडे लिक्विड डिटर्जंट लावून ब्रशने हळूवारपणे घासा. यामुळे डाग जमा होणार नाहीत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया