काहीवेळा चालता - फिरता हातात किंवा पायात काटा रुतून बसणे ही एक फारच कॉमन पण त्रासदायक समस्या आहे. हा काटा बाहेरून दिसत असला तरी तो काढणे खूप वेदनादायी असते, इतकंच नाही तर...काटा जोपर्यंत आपल्या हाता - पायात रुतून बसलेला असतो तोपर्यंत खूपच वेदना होतात, काटा निघेपर्यंत जीवाची फारच घालमेल होते. सहसा आपण काटा काढण्यासाठी सुई, पिन किंवा चिमट्याचा वापर करतो, परंतु यामुळे त्वचा सोलली जाण्याची किंवा जखम होण्याची भीती असते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत सुईचा वापर करणे अधिक कठीण होते(Home hacks to remove splinter or thorn from skin).
जर तुम्हालाही सुई किंवा पिन टोचण्याची भीती वाटत असेल, तर काळजी करू नका! सुई किंवा पिनचा वापर न करता, घरच्याघरीच सहज उपलब्ध वस्तूंनी इन्स्टंट पद्धतीने काटा काढता येतो. हाता - पायांत रुतून बसलेला काटा काढण्यासाठी (how to remove splinter from skin) सुई किंवा पिनचा वापर करण्यापेक्षा, काहीही न करता अगदी अलगदपणे काटा त्वचेच्या बाहेर यावा यासाठी खास दोन सोप्या ट्रिक्स पाहूयात...
हाता - पायांमध्ये रुतून बसलेला काटा काढण्याच्या २ भन्नाट ट्रिक्स...
पिन, सुई अशा टोकदार वस्तूंचा वापर करून आपल्या त्वचेमध्ये रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न करणे अतिशय धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेला इजा होण्याची तसेच इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत असे प्रयोग करू नयेत, असा सल्ला डॉक्टर नेहमीच देतात.
रात्रभर अंथरुणात कूस बदलता, झोपचं येत नाही? प्या कपभर 'हर्बल टी' - लागेल शांत व गाढ झोप...
१. हाता - पायांमध्ये रुतून बसलेला काटा काढण्यासाठी, एक वाटी घ्या. त्या वाटीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडं डिटर्जंट घाला. जेवढं डिटर्जंट असेल त्याच्या साधारण दुप्पट गरम पाणी घाला. आता जिथे काटा घुसला आहे तो भाग या पाण्यामध्ये २ ते ३ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. असं केल्यास काटा आपोआप पाण्यात बाहेर येऊन जाईल. जर काटा बाहेर आला नाही तर तुमच्या बोटाने अलगद दाब देऊन काढून घ्या.
२. याचबरोबर आपण दुसऱ्या ट्रीकचा देखील वापर करु शकतो. या दुसऱ्या ट्रिकमध्ये, आपल्याला एक लसूण पाकळी, बँडेज इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. त्वचेच्या ज्या भागात काटा रुतला आहे त्याच्या आजूबाजूच्या भागात बोटाने हलकेच दाब देत आजूबाजूची त्वचा मोकळी करून घ्यावी. मग एक लसूण पाकळी सोलून ज्या भागावर काटा रुतला आहे बरोबर त्यावर ठेवून वरून बँडेज बांधून घ्यावे. २ ते ३ तासांसाठी हे बँडेज असेच ठेवून द्यावे. त्यानंतर आपण बँडेज काढून पहाल तर काटा बाहेर निघून लसूण पाकळीत अडकून बाहेर येईल.
