Lokmat Sakhi >Social Viral > तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळपट, गचाळ झाली? २ सोपे उपाय- १० मिनिटांत बॅग स्वच्छ

तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळपट, गचाळ झाली? २ सोपे उपाय- १० मिनिटांत बॅग स्वच्छ

How To Remove Oil stains from tiffin bag?: तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळवंडून गेली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(home hacks to clean tiffin bag in just 10 minutes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 18:01 IST2025-08-07T18:00:30+5:302025-08-07T18:01:33+5:30

How To Remove Oil stains from tiffin bag?: तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळवंडून गेली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(home hacks to clean tiffin bag in just 10 minutes)

how to remove oil stains from tiffin bag? home hacks to clean tiffin bag in just 10 minutes, how to remove odour from tiffin bag | तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळपट, गचाळ झाली? २ सोपे उपाय- १० मिनिटांत बॅग स्वच्छ

तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळपट, गचाळ झाली? २ सोपे उपाय- १० मिनिटांत बॅग स्वच्छ

Highlightsकधी कधी त्या बॅगला खरकटे हात लागतात किंवा एखादा पदार्थही सांडतो. यामुळे डाग पडत जाऊन बॅग अगदीच काळपट, गचाळ दिसायला लागते.

लंचबॉक्स किंवा शाळेचा डबा ठेवण्यासाठी जवळपास सगळीच मुलं टिफिन बॅग वापरतात. ऑफिसाठीही कित्येक जण टिफिन बॅगच घेतात. सुरुवातीला या बॅग अगदी स्वच्छ असतात. पण नंतर जसा जसा त्यांचा वापर वाढतो, तसे तसे त्यांच्यावर तेलाचे डाग पडू लागतात. रोजचा डबा कितीही व्यवस्थित पॅक करून दिला किंवा तो कितीही चांगल्या क्वालिटीचा असला तरीही कधी कधी डब्यातल्या पदार्थांमधलं तेल बाहेर येतं आणि त्याचे डाग टिफिन बॅगवर पडतात. कधी कधी त्या बॅगला खरकटे हात लागतात किंवा एखादा पदार्थही सांडतो. यामुळे डाग पडत जाऊन बॅग अगदीच काळपट, गचाळ दिसायला लागते (home hacks to clean tiffin bag in just 10 minutes). ती स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.(how to remove oil stains from tiffin bag?)

 

टिफिन बॅगवरचे तेलाचे डाग कसे काढायचे?

१. पहिला उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं डिश वॉश लिक्विड घाला. यानंतर त्यामध्ये टिफिन बॅग भिजत घाला.

Rakhi Special Mehendi: भावाबहिणींची माया सांगणाऱ्या ८ सुंदर मेहेंदी डिझाईन्स- भावाच्या औक्षणासाठी सजतील हात

५ ते ७ मिनिटांनी बॅग पाण्याबाहेर काढा आणि जिथे डाग पडलेले आहेत त्या ठिकाणी लिंबाची फोड घासा. अगदी एका मिनिटांतच डाग निघून जातील. यानंतर ती बॅग पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. बॅग अगदी स्वच्छ होईल.

 

२. दुसरा उपाय करण्यासाठी थोडंसं व्हिनेगर वापरा. साधारण एक वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी व्हिनेगर आणि १ चमचा डिटर्जंट पावडर घाला. आता हे मिश्रण जिथे डाग पडलेले आहेत त्या भागावर शिंपडा.

केस भराभर पिकू लागले? 'या' पद्धतीने मेहेंदीचं तेल करून केसांना लावा, नॅचरली काळे होतील

५ मिनिटांनंतर कपडे धुण्याचा ब्रश घेऊन बॅग घासून काढा. डाग निघून जातील आणि बॅग स्वच्छ झालेली दिसेल. जर डाग जास्त पक्के असतील आणि एका धुण्यात निघाले नसतील तर हाच उपाय पुन्हा करा. 
 

Web Title: how to remove oil stains from tiffin bag? home hacks to clean tiffin bag in just 10 minutes, how to remove odour from tiffin bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.