lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक 

कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक 

Cleaning Tips For Oily Utensils: स्वयंपाकासाठी कढई हातात घेतली की ती हाताला तेलकट- चिकट लागते. असं तुमच्याही घरी होत असेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा (3 remedies to clean oily kitchen utensils or kadhai).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 02:10 PM2023-11-20T14:10:30+5:302023-11-20T14:11:08+5:30

Cleaning Tips For Oily Utensils: स्वयंपाकासाठी कढई हातात घेतली की ती हाताला तेलकट- चिकट लागते. असं तुमच्याही घरी होत असेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा (3 remedies to clean oily kitchen utensils or kadhai).

How to remove oil and grease stain from kitchen utensils? 3 remedies to clean oily kitchen utensils or kadhai | कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक 

कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक 

Highlightsतेलकट, चिकट आणि पिवळट झालेल्या कढई स्वच्छ करण्यासाठी पुढे दिलेले काही उपाय करून पाहा.

कढई हे स्वयंपाक घरात अगदी रोजच्या रोज लागणारे भांडे. भाजी असो, वरण असो किंवा मग एखादा तळणाचा पदार्थ करायचा असो, कढई हमखास लागतेच. बऱ्याचदा रोजच्या वापरातल्या कढई व्यवस्थित घासल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तेलाचा थर साचत राहातो. अशा कढई दिसायलाही पिवळट- काळपट दिसतात आणि हात लावल्यावर लगेचच त्यांचा तेलकटपणा, चिकटपणा जाणवतो. एकदा कढईवर असा तेलाचा थर चढला की मग तो काढून टाकणं अवघड होतं (How to remove oil and grease stain from kitchen utensils). म्हणूनच आता अशा तेलकट, चिकट आणि पिवळट झालेल्या कढई स्वच्छ करण्यासाठी पुढे दिलेले काही उपाय करून पाहा. (Cleaning Tips For Oily Utensils)

कढईचा चिकटपणा- तेलकटपणा कसा स्वच्छ करायचा?

१. गरम पाणी 

 

तेलकट- चिकट झालेल्या कढई स्वच्छ करण्यासाठी कधीही थंड पाणी वापरू नका. यामुळे कढईचा तेलकट थर कमी होणार नाही. कढईचा तेलकटपणा घालविण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये गरम पाणी टाका.

विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

अगदी कडक किंवा उकळतं पाणी केलं तरी चालेल. १५ ते २० मिनिटे ते पाणी कढईमध्ये तसेच राहू द्या. त्यानंतर कोणत्याही डिशवॉशचे काही थेंब तसेच मीठ एकत्र करून त्या कढईमध्ये टाका आणि घासणीने कढई घासून घ्या. 

 

२. लिंबू

कढईचा चिकट- तेलकटपणा काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस अतिशय उपयुक्त ठरतो.

कुंडीतल्या मातीचा कस वाढविणारे ३ पदार्थ, माती बदलण्याची गरज नाही- बाग नेहमीच सदाबहार राहील

यासाठी तेलकट झालेल्या कढईमध्ये लिंबाचा रस टाका. तो कढईच्या सगळ्या भागावर व्यवस्थित लावा. त्यानंतर १० मिनिटांनी त्या कढईमध्ये कडक पाणी टाका आणि घासणीने किंवा ब्रशने घासून कढई स्वच्छ करा. लिंबामुळे कढईतलं तेल शोषलं जातं. 

 

३. बेकिंग सोडा

हा एक अगदी साेपा उपाय आहे. हा उपाय करण्याआधी कढईमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी गरम पाणी टाकून ठेवा.

स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...

त्यानंतर बेकिंग सोडा, लिक्विड डिशवॉश आणि पाणी हे एकत्र करून त्याची थोडी घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कढईला लावा आणि घासणीने कढई घासून काढा. गरम पाण्याने कढई धुवून टाका. एकदम स्वच्छ होईल. 


 

Web Title: How to remove oil and grease stain from kitchen utensils? 3 remedies to clean oily kitchen utensils or kadhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.