आपण ज्या बाटल्यांमधून रोज पाणी (Water Bottle) पितो त्याला दुर्गंध यायला सुरूवात होते. कितीही स्वच्छ धुतली तरी, बॉटल प्लास्टीकची असो किंवा थर्मोप्लास्टीक किंवा स्टिलची (Viral Trick). पाणी पिताना घाणेरडा वास यायला सुरूवात होते. या व्यतिरिक्त जे लोक बॉटलमध्ये दूध किंवा चहा, कॉफी ठेवतात त्यातही घाणेरडा वास येतो. जिमला जाणारे लोक सिपर वापरतात त्यातूनही अनेकदा दुर्गंध येतो. साबणाने किंवा लिक्विड डिटर्जेंटनं धुतले तरी बाटल्यांना घाणेरडा वास येतच राहतो. हा वास घालवण्यासाठी एक सोपी ट्रिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (How To Remove Odour From Bottles By Using Just Bay Leaf Hack Video)
बाटली स्वच्छ करण्याची ही ट्रिक नेमकी काय?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. यात एक महिला बाटलीचा येणारा वास घालवण्यासाठी एक गमतीदार हॅक करते. यात ती महिला एका स्टिलच्या बाटलीमध्ये जळालेलं तमालपत्र घालते आणि झाकण लावते. काही मिनिटं बाटली अशीच ठेवून नंतर झाकण उघडून ती बाटली पाण्यानं स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर बॉटल एकदम चकचकीत दिसून येते. हा जुगाड प्लास्टीकच्या बाटल्यांसासाठी नसून स्टिलच्या बाटल्यांसाठी आहे. तुम्ही सुद्धा हे सोपे हॅक्स ट्राय करू शकता.
हा उपाय केल्यानं कोणतीही जास्तीत मेहनत न करता ना खर्च करता बाटलीतील सर्व घाण बाहेर निघते आणि दुर्गंधही येत नाही. फक्त गॅसवर एक तमालपत्र तुम्हाला जाळायचे आहे आणि बॉटलमध्ये घालून बंद करायचे आहे. काही मिनिटांनंतर बॉटलचे झाकण उघडा धूर बाहेर आल्यानंतर पाणी किंवा स्वच्छ डिटर्जेंटनं धुवून नंतर सुकवून बाटली वापरा.
पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट झाला? घराच्या कोपऱ्यात ५ पदार्थ ठेवा, न मरता पाली गायब होतील
हा व्हायरल हॅक इंस्टाग्रामवर @pari.gound.31 या नावानं शेअर करण्यात आला आहे जो खूपच व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओवर २ करोडपेक्षा जास्त व्हिव्हज आले असून २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. लोक या व्हिडिओवर जबरदस्त कमेंट्स करत आहेत. 'वाह हा कमालीचा हॅक आहे.' अशी कमेंट एकानं केली आहे तर दुसऱ्यानं प्लास्टीकच्या बाटलीवर हा हॅक करू नका... अशी कमेंट केली आहे.