Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > उडाला रंग झाला चांगल्या कपड्यांचा बेरंग, कपड्यांवरचे होळीचे डाग काढण्याचे ३ उपाय-न घासता न रगडता

उडाला रंग झाला चांगल्या कपड्यांचा बेरंग, कपड्यांवरचे होळीचे डाग काढण्याचे ३ उपाय-न घासता न रगडता

How to Remove Holi Colours From Clothes?: रंग खेळताना चुकून चांगल्या कपड्यांवर रंगांचे डाग लागले असतील तर ते काढून टाकण्यासाठी पुढे सांगितलेले उपाय करून पाहा...(cleaning tips to wash holi colours from clothes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 17:39 IST2026-03-04T17:38:01+5:302026-03-04T17:39:09+5:30

How to Remove Holi Colours From Clothes?: रंग खेळताना चुकून चांगल्या कपड्यांवर रंगांचे डाग लागले असतील तर ते काढून टाकण्यासाठी पुढे सांगितलेले उपाय करून पाहा...(cleaning tips to wash holi colours from clothes)

how to remove holi colours from clothes, cleaning tips to wash holi colours from clothes  | उडाला रंग झाला चांगल्या कपड्यांचा बेरंग, कपड्यांवरचे होळीचे डाग काढण्याचे ३ उपाय-न घासता न रगडता

उडाला रंग झाला चांगल्या कपड्यांचा बेरंग, कपड्यांवरचे होळीचे डाग काढण्याचे ३ उपाय-न घासता न रगडता

Highlightsहे डाग थोडे वेगळ्या पद्धतीने काढायला हवे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...

होळीचा सण नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. या दिवशी एकमेकांना रंगवून टाकण्यात काही जण एवढे दंग होऊन जातात की त्या नादात घरातल्या इतर चांगल्या कपड्यांनाही रंगाचे डाग लागतात. कुठे चुकून रंग सांडतो तर कधी बाहेरून रंग खेळून आल्यानंतर चुकून घरातल्या इतर कपड्यांना रंगाचे हात लागतात. असं काही झालं की मग त्या कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग कसे काढून टाकावे हा मोठाचा प्रश्न पडतो. कारण नेहमीप्रमाणे तुम्ही रंगाचे कपडे धुतले तर डाग निघून जाण्याऐवजी जास्त पसरतात आणि कपडा खराब होतो (How to Remove Holi Colours From Clothes?). म्हणूनच हे डाग थोडे वेगळ्या पद्धतीने काढायला हवे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...(cleaning tips to wash holi colours from clothes)

चांगल्या कपड्यांवर पडलेले होळीच्या रंगांचे डाग कसे काढावे?

 

१. ब्लिचिंग पावडर

ज्या कपड्यावर डाग पडला आहे तो कपडा आधी इतर कपड्यांतून वेगळा काढा. कारण रंगाचे डाग इतर कपड्यांनाही लागू शकतात. ज्या भागात रंग लागला आहे, तो भाग गरम पाण्यात एखादा तास भिजत ठेवा.

थुलथुलीत शरीर बदलेल रूप होईल सडपातळ- 'या' पद्धतीने रोज ब्लॅक कॉफी प्या, पाहा तुमचा मेकओव्हर

यानंतर एका बादलीमध्ये ब्लिचिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करा. आता या पाण्यात डाग पडलेले कपडे एखादा तास भिजवून ठेवा. यानंतर कपडे धुण्याचा ब्रश घेऊन तो हलकेच कपड्यांवर घासा. डाग निघून जातील.

 

२. लिंबाचा रस

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग काढण्यासाठी लिंबाच्या रसाचाही वापर करता येतो. हा उपाय करण्यासाठीही डाग पडलेले कपडे अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजत ठेवा. यानंतर कपडे पाण्यातून बाहेर काढा.

उन्हाळ्यात घरभर पालीच्या पिलांचा सुळसुळाट, २ उपाय- एकही पाल घराच्या भिंतीवर दिसणार नाही..

ज्या ठिकाणी डाग पडला आहे त्या डागावर थोडा लिंबाचा रस घाला. त्यानंतर त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि थोडे डिशवॉश लिक्वीड घाला. यानंतर कपडे धुण्याच्या ब्रशने घासून डाग काढून टाका. एका धुण्यात डाग गेला नाही तर हा उपाय पुन्हा करा. कपडा स्वच्छ होईल. 


 

Web Title : होली के दाग कपड़ों से आसानी से हटाएं: 3 सरल, बिना रगड़े तरीके।

Web Summary : होली के रंग कपड़ों पर लग सकते हैं। दाग लगे कपड़े को गर्म पानी में भिगो दें। ब्लीचिंग पाउडर को बेकिंग सोडा के साथ या नींबू के रस को डिश सोप के साथ मिलाकर धीरे से रगड़ें और दाग हटा दें। आवश्यकतानुसार दोहराएं।

Web Title : Remove Holi stains from clothes easily: 3 simple, no-rub methods.

Web Summary : Holi colors can stain clothes. Soak the stained garment in warm water. Use bleaching powder with baking soda or lemon juice with dish soap to gently scrub and remove the stains. Repeat if necessary.