Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्री किचनमध्ये बारीक झुरळं खूप फिरतात? ५ उपाय, घरातून गायब होईल प्रत्येक झुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:40 IST

How To Remove Cockroaches Form Home : तमालपत्र हा मसाल्याचा पदार्थ जेवणात चवीसाठी वापरला जातो. तमालपत्राचा तीव्र वास झुरळांना जराही आवडत नाही.

झुरळं (Cockroaches) फक्त घराची स्वच्छता  बिघडवत नाही तर अस्थमा, एलर्जी यांसारखे आजारही पसरवतात. इंटिग्रेडेड पेस्ट मॅनेजमेंटच्या रिपोर्ट्सनुसार  झुरळांना फक्त घालवण्याचा प्रयत्न करू नका (How To Remove Cockroaches Form Home). तर झुरळ येण्याची कारणं नष्ट करायला हवीत. काही सोपे आणि घरगुती उपाय करून तुमचे घर किटकमुक्त होण्यास मदत होईल. (5 Effective Ways To Remove Cockroaches Form Home)

बोरिक एसिडचा वापर

बोरिक एसिड झुरळांसाठी स्लो पॉयजन मानले जाते. जर्नल ऑफ इकोनॉमिक एन्टोमोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार झुरळं बोरीक एसिडच्या संपर्कात येताच त्यांचे बाहेरील आवरण खराब व्हायला सुरूवात होते.  साखर किंवा पिठासोबत मिसळून घराच्या कोपऱ्यांमध्ये  घातल्यास किटक दूर होण्यास मदत होईल.(Ref)

पुदीन्याच्या तेलाचा स्प्रे

पुदिन्याचे तेल हा सर्वात प्रभावी उपाय  आहे. रिसर्चनुसार पुदिन्याच्या तेलाचा सुगंध झुरळांच्या श्वसन तंत्रासाठी असह्य ठरतो. पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब मिसळून सिंक आणि कपाटांच्या कोपऱ्यात स्प्रे करा. ज्यामुळे झुरळं बाहेर पळतील.

बेकींग सोडा आणि साखर

हा एक प्रसिद्ध घरगुती उपाय आहे. साखर खाण्यासाठी झुरळं साखरेकडे आकर्षीत होतात. त्याचवेळी बेकींग सोडा त्यांच्या पोटात गेल्यामुळे गॅस तयार होतो. झुरळं हा गॅस बाहेर काढण्यास सक्षम नसतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 

तमालपत्र

 तमालपत्र हा मसाल्याचा पदार्थ जेवणात चवीसाठी वापरला जातो. तमालपत्राचा तीव्र वास झुरळांना जराही आवडत नाही. तमालपत्राची पानं कुस्करून घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास झुरळं लांब होण्यास मदत होईल. तमालपत्र जाळून त्याचा धूर केल्यासही झुरळं दूर होतात. पण हा उपाय करताना आजूबाजूला लहान मुलं  किंवा पाळीव प्राणी नसतील याची काळजी  घ्या.

नारळाचं तेल आणि लवंग

लवंगात युजेनॉल हा घटक असतो ज्याला नैसर्गिक किटकनाशक मानले जाते. अनेक किटक शास्त्रांच्यामते लवंगाचा तीव्र सुगंध झुरळांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. लवंग थेट कपाटात ठेवा किंवा लवंगाचे तेल खोबरेल तेलात मिसळून अशा ठिकाणी लावा जिथे झुरळं लपतात. घरात कुठेही खरकटे अन्नपदार्थ नसतील याची काळजी घ्या. रात्री  किचनमध्ये अन्नााचे कण पडलेले असतील तर झुरळाचा वावर वाढतो आणि छोटी छोटी झुरळं तयार होतात म्हणून सगळ्यात आधी स्वच्छतेची काळजी घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Get Rid of Cockroaches: 5 Easy Home Remedies

Web Summary : Cockroaches spread diseases. Eliminate them by destroying their causes. Use boric acid, peppermint oil, baking soda, bay leaves, or clove-infused coconut oil. Keep the kitchen clean, especially at night, to prevent infestations.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया