Join us

How to Reduce Electricity Bill : लाईट बिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय? नवीन 3 ट्रिक्स, वीज, पैसे दोन्ही वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 14:00 IST

How to Reduce Electricity Bill : सध्या वीजबिल वाचवण्यासाठी सौरऊर्जा हा एकमेव उपाय उरला आहे.

लाईट बिल खूप जास्त येतं ही तक्रार अनेकजण करतात. पण वारंवार अर्ज करूनही बिलात तफावत दिसत नाही. विज आणि पैसे या दोन्हींची बचत कशी करता येईल याकडे लक्ष दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते. (How to reduce electricity bill) आता अशी अनेक तंत्र आली आहेत ज्यामुळे वीज बिलाचा ताण दूर होईल. समजून घेऊया सोप्या पद्धतीनं घराचे वीज बिल कसे वाचवता येईल. (3 Super Easy Ways to Lower Your Electricity Bill)

सौर उर्जा

 सध्या  वीजबिल वाचवण्यासाठी सौरऊर्जा हा एकमेव उपाय उरला आहे. अनेकांनी आपल्या घरात सोलर पॅनल बसवले आहेत, तर अनेक लोक लवकरच आपल्या घरात सोलर पॅनल बसवणार आहेत. सौरऊर्जेमुळे आपण वीज बिल सहज वाचवू शकतो.

खिडक्या

प्रत्येक घरात खिडक्या असतात आणि त्या काचेच्या असतात, जर आपण उंच इमारतींबद्दल बोललो तर उंच इमारतींमध्ये काचेचा वापर केला जातो. तिथल्या काचेतून वीजनिर्मिती सुरू झाली तर सगळ्यांनाच काम खूप सोपं होईल.

ट्रांसपेरेंट ग्लास

पारदर्शक सौर खिडक्या हे नवीन तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्माण करू शकता. खिडकीच्या काचातून वीज पुरवठ्याची चर्चा सध्या तुम्हाला काल्पनिक वाटेल, पण येणाऱ्या काळात हे परिणामकारक ठरू शकते. 

या तंत्रज्ञानाला फोटोव्होल्टेइक ग्लास देखील म्हणतात. हे कोणत्याही काचेच्या शीट किंवा विंडोला पूर्णपणे पीव्ही सेलमध्ये रूपांतरित करू शकते. आजच्या युगात काचेचा वापर जवळपास सर्वत्र होतो. ज्यावर हे तंत्रज्ञान सहज वापरता येईल. अशाप्रकारे, आपण देखील विजेशी संबंधित मोठ्या समस्येवर मात करू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया