Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजमधून कुबट- सडका वास येतो? ३ गोष्टी करून पाहा- दुर्गंधी जाऊन फ्रिज होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 14:31 IST

Refrigerator Cleaning Tips: फ्रिजमधून कुबट वास येत असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने फ्रिज स्वच्छ करून पाहा...(how to reduce bad smell from refrigerator?)

ठळक मुद्देजर फ्रिजमधून सतत कुबट, घाण वास येत असेल तर फ्रिजच्या मागच्या बाजुने असणारा ट्रे एकदा तपासून पाहा.

फ्रिज ही आपल्या घरातली अगदी रोजची वापरण्याची वस्तू.. आता तर उन्हाळा सुरू होत आहे; त्यामुळे फ्रिजचा वापर जास्त वाढणार... फ्रिज ही उपयोगाची वस्तू असली तरी आपण हल्ली त्याचा अतिरेक करतो आहोत. कारण त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पदार्थ आणायचे आणि ते फ्रिजमध्ये कोंबायचे अशी वृत्ती वाढली आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो तो एक विषय आहेच. पण त्यासोबतच आपण फ्रिजचेही नुकसान करत आहोत. त्याच्या क्षमतेपेक्षा त्यात साठवणूक करून ठेवत आहोत. त्यामुळे मग त्याच्यावरही ताण येतो आणि ते खराब होते. फ्रिजमधून दुर्गंधी येऊ लागणं हे त्याचंच एक लक्षण (how to get rid of fridge odour?). म्हणूनच जर वारंवार स्वच्छ करूनही तुमच्या फ्रिजमधून कुबट, घाण वास येत असेल (tips and tricks to clean fridge) तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(how to reduce bad smell from refrigerator?)

फ्रिजमधून कुबट, घाण वास येत असेल तर काय करावे?

 

१. फ्रिजमधून दुर्गंधी येण्याची बरीच कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे त्यात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ असणे. असं तुमच्या फ्रिजच्या बाबतीत होत नाहीना ते एकदा तपासा. कारण जेव्हा फ्रिजमध्ये खूप जास्त वस्तू ठेवल्या जातात तेव्हा ते थंड ठेवण्यासाठीच्या यंत्रणेवर ताण येतो आणि त्यामुळे त्याचे कार्य बिघडते. यामुळेही फ्रिजमधून दुर्गंधी येऊ शकते.

२. बऱ्याचदा फ्रिजरमध्ये आईस्क्रिम किंवा इतर पदार्थ ठेवलेले असतात. जर वीज गेलीच तर फ्रिज बंद पडते. फ्रिजरमधले पदार्थ वितळतात आणि फ्रिजच्या मागच्या बाजुला असणाऱ्या ट्रेमध्ये जमा होतात. त्या पाण्याचाही काही दिवसांत घाण वास येऊ लागतो. त्यामुळे जर फ्रिजमधून सतत कुबट, घाण वास येत असेल तर फ्रिजच्या मागच्या बाजुने असणारा ट्रे एकदा तपासून पाहा.

 

३. संपूर्ण फ्रिज रिकामं करून एकदा ते व्यवस्थित पुसून घ्या. स्वच्छ करा. फ्रिजच्या दरवाज्याला असणारं रबरदेखील घासून घ्या. त्याच्यावर काळेपणा साचला असेल, घाण जमलेली असेल तरीही त्याचं दार व्यवस्थित लागत नाही. त्यामुळेही फ्रिजमधून दुर्गंधी येऊ शकते.

कोण म्हणे उन्हाळ्यात दही पातळ होतं? २ टिप्स, असं घट्ट होईल की केकसारखं कापता येईल

४. स्वच्छ केलेल्या फ्रिजमध्ये काही तासांसाठी एका वाटीत बेकिंग सोडा घालून ठेवा. तसेच फ्रिजच्या प्रत्येक शेल्फमध्ये लिंबाची फोड ठेवा. लिंबू आणि बेकिंग सोडा फ्रिजमधली दुर्गंधी शोषून घेण्यास मदत करतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eliminate fridge odor: Three simple steps for a fresh refrigerator.

Web Summary : Is your fridge smelly? Overloading strains the system. Check the back tray for stagnant water. Clean thoroughly, including door seals. Baking soda and lemon absorb odors, keeping your fridge fresh.
टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडीकिचन टिप्स