Join us

एकावेळी ५ चपात्या लाटण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, व्हायरल व्हिडिओ- लाटण्याच्या कंटाळ्यावर उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:10 IST

Women Roti Making Video Goes Viral (Chapati kashi karaychi) : एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या एक महिला एकावेळी ५ चपात्या करताना दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या वातावरणात कधी गारवा तर कधी दमट वातावरण असतं ज्याचा परिणाम किचममध्ये काम करत असेलल्या महिलांना जाणवतो. (Cooking Hack Viral Video) किचनमध्ये उभं राहून तासनतास स्वंयपाक बनवताना खूप घाम येतो आणि कधी एकदा स्वयंपाक तयार होतोय असं होतं. ( How To Make Round Chapati At Home Women Roti Making Video Goes Viral)

आपण केलेल्या चपात्या सॉफ्ट व्हाव्यात आणि पटापट करता याव्यात अशी प्रत्येकीचा इच्छा असते. पण काहीजण काम संपवण्याच्या नादात भन्नाट जुगाड करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या एक महिला एकावेळी ५ चपात्या करताना दिसून येत आहे. (How To Make Chapati Faster)

हा व्हिडिओ इंस्टाग्राम युजर जेसिका गुप्ताने आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यात ती एकावेळी ५ चपात्या करताना दिसून येत आहे. एकावेळी भरपूर चपात्या करण्याची ही ट्रिक लोकांना खूप आवडली आहे. ही सोपी ट्रिक रोज चपात्या करताना उपयोगी ठरू शकते. घरी अचानक पाहूणे आहे तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. ज्यामुळे चपात्या मऊ, फुगलेल्या बनतील.

चपाती करण्याची ही खास टेक्निक होणती

व्हायरल व्हिडिओमध्ये या महिलेनं सगळ्यात आधी चपातीचं कणीक घेतलं आहे आणि त्याला पीठ लावून किचन प्लॅटफॉर्मवर ठेवून लाटण्याच्या मदतीने लांब लाटून घेतलं आहे. त्यानंतर  १ गोल मध्यम आकाराचा डब्बा घेतला आहे आणि त्यावर पीठ घालून गोल गोल चपात्यांना आकार दिला आहे. आपण पुऱ्या करतो त्याचपद्धतीने या महिलेनं चपात्या केल्या आहेत.  त्यानंतर तिने एका तव्यावर ३ ते ४ चपात्या शेकण्यासाठी ठेवल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला थेट आचेवरून चपात्या खाली उतरवल्या जात आहेत.

कॅल्शियम पाहिजे पण दूध नको? डॉक्टर सांगतात रोज खा १ चमचा पांढरे तीळ, हाडांना येईल बळकटी

सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत तर युजर्सनी एकापेक्षा एक कमेंट्स या व्हिडिओवर केल्या आहेत.हार्ड वर्क ऐवजी स्मार्ट वर्क करायला हवं  असं कॅप्शन दिलं आहे. एका युजरने कमेंट केली,की सासर चे लोक यातसुद्धा कमी शोधतील. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया